Healthy Relationship : नात्यांमध्ये ‘भूतकाळा’चं संकट आलं तर? आधीच राहा तयार

नातेसंबंधांमध्ये जर लपवलेला भूतकाळ अचानक समोर आला, तर समस्या निर्माण होते. त्यामुळे नाती संपण्याची शक्यता असते. काही सोप्या उपायांनी अशी परिस्थिती हाताळता येऊ शकते.

Healthy Relationship
नात्यांमध्ये ‘भूतकाळा’चं संकट आलं तर?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नात्यांमध्ये विश्वासाचा धागा सर्वात महत्त्वाचा
  • भूतकाळ नात्यांमध्ये आला तर निर्माण होतं संकट
  • संवादातून सुटतात अनेक समस्या

Healthy Relationship : नाती (Relationship) ही अत्यंत नाजूक गोष्ट असते. कुठलंही नातं हे विश्वासाच्या आधारे घट्ट बांधलेलं असतं. जर विश्वासाचा धागाच कमकुवत झाला, तर नातं तुटायला वेळ लागत नाही. कुठलीही व्यक्ती किंवा कुठलंही कारण त्यासाठी पुरेसं ठरतं. एखादी किरकोळ गोष्टदेखील (Ordinary thing) तुमच्या नात्यात विष कालवू शकते आणि नातं संपू शकतं. काही नाती अनेक वर्षांपासून बिघडलेली असतात आणि त्यानंतर ती दुरुस्त करण्याची वेळही निघून जाते. त्यामुळे नात्यांबाबत सावध राहणं आणि योग्य रितीनं नात्यांचं संगोपन करणं आवश्यक ठरतं. अनेकदा, सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक भूतकाळातील एखादी घटना समोर येते आणि आपल्या नात्यासमोर आव्हान निर्माण करते. अशा वेळी काही बाबी लक्षात ठेवणं आणि त्यांचं पालन करणं आवश्यक असतं. जाणून घेऊया अशाच काही बाबी. 

संवाद 

कुठलंही नातं टिकण्यासाठी त्यात संवाद असणं फार गरजेचं असतं. तुमच्या भावभावना, आनंद, दुःख, प्रेम, राग या सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणं आवश्यक असतं. जिथं हे शेअरिंग कमी होतं, तिथं नातंही कमकुवत व्हायला सुुरुवात होते. आपल्या लाईफ पार्टनरला लोक अनेक गोष्टी सांगत नाहीत. अमूक एक गोष्ट पार्टनरला समजली, तर आपल्याविषयी वाईट मत होईल, असं वाटल्याने बऱ्याच गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेवल्या जातात. मात्र काही वर्षांनी त्या गोष्टी समजल्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याची भावना पार्टनरच्या मनात निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्या मनातील सर्व गोष्टी एकमेकांना सांगणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट तुम्ही स्वतः सांगितल्यानंतर त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता कमी असते. ती इतरांकडून कळल्यानंतर अधिक वाईट प्रकारे ती घेतली जाऊ शकते. 

अधिक वाचा - Costliest Pub : इथे आत्मा थंड करण्यासाठी खिसा हवा गरम! या पबमध्ये चकना घेणाराही होऊ शकतो भिकारी

माफी मागणं

आपली चूक झाली असेल तर ती मान्य करून मोकळ्या मनानं माफी मागणं गरजेचं आहे. एखाद्या छोट्या किंवा किरकोळ कारणावरून भांडण सुरू होतं आणि अनेकजण आपल्या इगोपायी ते लावून धरतात. ज्या क्षणी आपली चूक आहे, हे लक्षात येईल, त्या क्षणी एकमेकांची माफी मागून मोकळं होणं, हा सर्वोत्तम उपाय असतो. त्यामुळे तुमचं नातंही टिकून राहतं आणि इगोदेखील कमी होतो. 

अधिक वाचा - Today in Hisotory 24th August 2022 : आज आहे हुतात्मा राजगुरू यांची जयंती, तसेच माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

चुका काढू नका

अनेक पार्टनर सतत एकमेकांचे दोष, चुका दाखवताना दिसतात. मात्र त्यामुळे एकमेकांविषयीचा राग आणि मत्सरच वाढीला लागतो. त्याऐवजी एकमेकांच्या चांगल्या बाबींवर फोकस करा आणि संधी मिळेल तेव्हा आपल्या पार्टनरच्या चांगल्या गुणांचं तोंडभरून कौतुक करा. यामुळे दीर्घकाळ तुमचं नातं टिकून राहिल आणि सुखी आयुष्याचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. 

डिस्क्लेमर - नातेसंबंधांबाबतच्या या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला नातेसंबंधांबाबत काही गंभीर समस्या असतील, तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी