Vastu tips : आर्थिक स्थैर्यासाठी करा हे उपाय, होईल धनप्राप्ती...भरलेली राहील तिजोरी

Vastushastra : प्रत्येक व्यक्तीला घरात लक्ष्मी हवी असते. आपल्या आयुष्यात सुबत्ता, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी (Wealth)असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra)उत्तर दिशा ही संपत्तीची देवता असलेल्या कुबेरची दिशा मानली जाते. असे मानले जाते की ही दिशा स्वच्छ ठेवल्याने घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहते. वास्तुशास्त्रामध्ये धन लाभाशी संबंधित काही विशेष उपाय सांगितले आहेत.

Vastu tips
संपत्तीसाठीच्या वास्तु टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी (Wealth)असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
  • उत्तर दिशा ही संपत्तीची देवता असलेल्या कुबेरची दिशा मानली जाते.
  • वास्तुशास्त्रामध्ये धन लाभाशी संबंधित काही विशेष उपाय सांगितले आहेत.

Vastu tips for money : नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीला घरात लक्ष्मी हवी असते. आपल्या आयुष्यात सुबत्ता, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी (Wealth)असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra)उत्तर दिशा ही संपत्तीची देवता असलेल्या कुबेरची दिशा मानली जाते. असे मानले जाते की ही दिशा स्वच्छ ठेवल्याने घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहते. वास्तुशास्त्रामध्ये धन लाभाशी संबंधित काही विशेष उपाय सांगितले आहेत. जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर हे वास्तु उपाय करून पाहा- (Implement these Vastushastra tips to get the wealth)

अधिक वाचा : Samudra Shastra: शरीराचे अवयव फडफडणे, थरथरणे देतात शुभ आणि अशुभाचे संकेत : जाणून घ्या काय आहेत हे संकेत

धनप्राप्तीसाठीच्या वास्तु टिप्स-

1. वास्तुशास्त्रानुसार दररोज सकाळी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडले पाहिजेत. वास्तूनुसार असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन प्राप्ती होते.

2. वास्तुशास्त्रानुसार शंख लक्ष्मी मातेशी संबंधित आहे. अशा स्थितीत पूजेच्या ठिकाणी शंख अवश्य ठेवावा. धनाची देवी लक्ष्मी सोबत रोज शंखाची पूजा करा.

3. वास्तुशास्त्रानुसार धन मिळविण्यासाठी लोकांनी झाडू नेहमी लपवून ठेवावा. झाडूचा संबंध लक्ष्मी मातेशी आहे असे मानले जाते. त्यामुळे झाडू कधीही इकडे तिकडे फेकू नका किंवा पायाखाली येऊ देऊ नका.

अधिक वाचा : Viral Video: मुलाने चक्क गर्लफ्रेंडचे पाय पकडले, पण...

4. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचे वास्तव्य पिंपळाच्या झाडामध्ये असते. अशा स्थितीत दररोज आंघोळीनंतर पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.

5. वास्तूनुसार आर्थिक तंगी किंवा आर्थिक संकटापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी एखाद्या भांड्यात अशा ठिकाणी ठेवावी जिथे कोणी पाहू शकत नाही. यासोबतच दररोज तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकून आंघोळ करावी. असे केल्याने पैशाची कमतरता दूर होते असे मानले जाते.

6. वास्तुनुसार लक्ष्मी मातेचे वास्तव्य स्वच्छतेत असते. अशा वेळी घर चुकूनही घाण करू नये. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येत नाही. घरात नेहमी स्वच्छता ठेवावी.

7. वास्तूनुसार पूजास्थळी तांदळाच्या ढिगाऱ्यावर  अन्नपूर्णेची पूजा करा आणि तिची रोज पूजा करा. असे मानले जाते की माता अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात नेहमी अन्न आणि धनाचा साठा राहतो.

अधिक वाचा : चीनमध्ये सहा दशकांतील सर्वात मोठा कोरडा दुष्काळ, आशियातील सर्वात मोठ्या नदीचे पात्र कोरडेठाक

वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वाढविणारे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे विशेष महत्त्व आहे. कोणत्या दिशेचा कशा प्रकारे वापर झाल्यास घरात राहणाऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि कशा प्रकारे वापर झाला तर हानी होऊ शकते याविषयी वास्तुशास्त्रात मार्गदर्शन केले आहे. 

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी