Diwali Padwa काय आहे दिवाळी पाडवा या दिवसाचे महत्त्व?

Importance of Balipratipada and Diwali Padwa Festival : कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस आज (शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२१) आहे.

Importance of Balipratipada and Diwali Padwa Festival
Diwali Padwa काय आहे दिवाळी पाडवा या दिवसाचे महत्त्व? 
थोडं पण कामाचं
  • Diwali Padwa काय आहे दिवाळी पाडवा या दिवसाचे महत्त्व?
  • शुभ मुहूर्त - सकाळी ६.३६ ते ८.४७ आणि दुपारी ३.२२ ते संध्याकाळी ५.३३
  • बळीराजाची गोष्ट

Importance of Balipratipada and Diwali Padwa Festival : कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस आज (शुक्रवार ५ नोव्हेंबर २०२१) आहे. आजच्या दिवशी घर तसेच कामाचे ठिकाण येथे दारापुढे सुबक रांगोळी काढतात. तेलाच्या दिव्यांनी परिसर सजवतात. आकर्षक रोषणाई करतात. नवे कपडे घालतात. नटतात-सजतात. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असे या दिवसाचे वर्णन करतात. 

शुभ मुहूर्त - सकाळी ६.३६ ते ८.४७ आणि दुपारी ३.२२ ते संध्याकाळी ५.३३

आजच्या दिवशी शुभकार्य करणे अथवा औक्षण करणे यासाठी सर्वाधिक शुभ वेळ ही मर्यादीत तासांची आहे, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे.

बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा हा दिवस शुभ समजला जातो. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना आजच्या दिवशी करतात. या शुभ दिनी पत्नी पतीला सुगंधी तेल-उटणे लावते. पती अभ्यंगस्नान करुन येतो. यानंतर पत्नी पतीचे औक्षण (ओवाळणे) करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. बलिप्रतिपदा असल्यामुळे बळीराजाची पूजा करतात. पंचरंगी रांगोळीने बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. अन्नदान आणि दीपदान केले जाते. ग्रामीण भागात आजच्या दिवशी गोवर्धन पूजा करतात. यासाठी शेणाचा पर्वत करुन त्याला दुर्वा आणि फुले वाहतात.  श्रीकृष्ण, इंद्र, गायी आणि वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

बळीराजाची गोष्ट

राक्षस कुळात जन्मलेल्या बळीराजाने (बलीराजा) देवांचा पराभव केला. दानशूरतेसाठी त्याची ख्याती होती. मागेल ते दान देताना तो विचार करत नसे. त्याने यज्ञ केला. भगवान विष्णू बटू वामनाचा अवतार घेऊन प्रकटले आणि त्यांनी भिक्षा मागितली. काय हवे असे बळीराजाने विचारले. वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. बळीराजाने विचार न करता दान दिले. दान मिळताच वामनाने विराट रूप धारण केले आणि पहिल्या पावलाने पृथ्वी तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतराळ (स्वर्ग-नरक आदी) व्यापले. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले त्यावर बळीराजाने ते माझ्या मस्तकावर ठेवा असे सांगितले. वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळलोकी पाठवले. पाताळात बळीराजाचे राज्य स्थापन झाले. पाताळात जाण्याआधी बळीराजाने पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा एक वर मागितला. वामनाने हा वर दिला. यामुळेच दरवर्षी आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्‍विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान करणाऱ्यांवरील सर्व संकटे दूर होतात. त्यांना अपमृत्यू येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. वामनाने दिलेल्या वरामुळेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नागरिक बळीराजाच्या दानशूरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी