Mother’s Day Special: लॉकडाऊन दरम्यान असा साजरा करा मदर्स डे, आईला असं द्या सरप्राईज

लाइफफंडा
Updated May 08, 2020 | 21:16 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Mother's Day Celebration Idea: ‘मदर्स डे’निमित्त मुलं आपल्या आईसाठी अनेक सरप्राईज प्लान करत असतात. पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांच्या प्लानवर पाणी फेरलं गेलंय. या लॉकडाऊनमध्येही आपण आईसाठी करू शकता काही खास

Mother's Day Celebration Idea
असा साजरा करा लॉकडाऊनमध्ये मदर्स डे 

थोडं पण कामाचं

  • यंदा लॉकडाऊनमध्ये मदर्स डे करा अशाप्रकारे स्पेशल
  • आईसाठी खास सरप्राईज ती उठायच्या आधीच तिच्या आवडीचा नाश्ता बनवून ठेवा.
  • मॉम ट्रिव्हिया बनवा आणि कुटुंबियांसोबत हा स्पेशल गेम खेळा

Creative Ideas for Mother’s Day: आईसाठी मुलांनी एखादं थोटसं काम जरी केलं तरी ती आनंदी होत असते. पण तरीही मुलांना मदर्स डेला आईसाठी काही स्पेशल करायचं असतं. यावर्षी येत्या १० मे म्हणजेच रविवारी मदर्स डे आहे. हा दिवस स्पेशल करण्यासाठी आपण काही विचार करत असाल तर काही आयडिया जाणून घ्या. जेणेकरून घरात राहूनच आपण आपल्या आईसाठी हा दिवस खास बनवू शकतो.

१.आयत्या जागी आणून द्या चहा-नाश्ता

आईचा हा दिवस स्पेशल करण्यासाठी तिला त्यादिवशी आयत्या जागी चहा आणि नाश्ता आणून द्या. नाश्ता आईच्या आवडीचा बनवा. आई झोपून उठताच तिच्यासाठी हे सरप्राईज तयार असू द्या. आपल्याला हवं असेल तर यूट्यूबवरून हे पदार्थ कसे बनवायचे ते शिकून घ्या.

२. मॉम ट्रिविया

‘मदर्स डे’ स्पेशल करण्यासाठी आपण मॉम ट्रिवियाची एक मजेदार आयडिया ट्राय करू शकता. यात आपल्या कुटुंबियांसोबत हा गेम खेळू शकता. आईशी निगडित अनेक प्रश्न आपण कुटुंबियांना विचारू शकता आणि आई कुणाचं उत्तर बरोबर निघालं हे सांगेल. ही खूप युनिक आयडिया आहे आपला दिवस खास बनविण्यासाठी.

३. आईसोबत मिळून झाड लाव, झाडाची काळजी घ्या

जर शक्य असेल तर आईसोबत या दिवशी झाड लावा. कुठलंही फुल झाड मदर्स डे निमित्त लावण्याचा निर्णय घ्या. ही गोष्ट आपल्या आठवणीत खास राहिल आणि यामुळे वातावरणही स्पेशल होईल. जेव्हा आपण ते झाड वाढतांना बघाल तेव्हा आपल्याला आणि आपल्या आईला दोघांनाही आनंद होईल.

४. आईसाठी लिहा कविता किंवा गाणं म्हणा

स्पेशल दिवस आहे तर काही खास करणं गरजेचं आहे. मदर्स डेला आपण आपल्या आईसाठी एखादी कविता लिहू शकता. जर कविता नसेल येत तर आईसाठी एखादं गाणं गाऊ शकता. रात्री जेवणापूर्वी आपण ही एक्टिव्हिटी एंजॉय करू शकता.

५. डेझर्टमध्ये तयार करा आईसक्रीम

‘मदर्स डे’ला आपण जरी रात्रीचं जेवण बनवू शकले नाही तर वडिलांसोबत मिळून आईसाठी तिच्या आवडीचा पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करा. आपण डेझर्ट म्हणून सोप्या पद्धतीनं आईसक्रीम बनवू शकता. फुल क्रीम दूध उकळून त्यात कस्टर्ड पावडर मिक्स करा. वॅनिला इसेंस टाकून आणि खूप सारे ड्राय फ्रुट्स मिक्स करा. दूध जेव्हा खूप घट्ट होईल तेव्हा ते थंड करून प्लास्टिकच्या बॉक्समध्ये फ्रीझरमध्ये ठेवावं. जेव्हा ते तयार होईल तेव्हा ते मिक्सरमधून काढावं. मिश्रण फ्लपी होईल. त्यानंतर पुन्हा त्याच डब्यात ठेवून त्यावर अॅल्युमिनीयम फॉईल झाकून झाकण लावावं आणि पुन्हा ते फ्रीझरमध्ये ठेवावं. यानंतर काही तासांनी आपलं आईसक्रीम तयार झालेलं असेल.

६. गॅलरी किंवा बॅकयार्डमध्ये करा एंजॉय

मदर्स डे निमित्त आपण आपल्या घराच्या बॅकयाईड किंवा गॅलरीमध्ये डिनर करू शकता. तसंच तिथे काही अॅक्टिव्हिटी करा. असं केल्यानं आपल्याला आणि आपल्या आईला चांगलं वाटेल आणि आईला हे सरप्राईज आवडेल.

७. एक स्क्रॅपबुक तयार करा

आई आणि कुटुंबियांच्या फोटोंचं एक स्क्रॅपबुक तयार करा. यात आपल्या लहानपणापासूनचे फोटो यात लावा. या स्क्रॅपबुकमध्ये आपण काही युनिक आयडिया लढवून ते स्पेशल बनवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी