Independence Day 2022: लोकमान्य टिळक, गांधी ते सुभाषचंद्र बोस; स्वातंत्र्यापूर्वी याच भाषणांमुळे इंग्रजांना फुटला होता घाम, वाचा पाच सुप्रसिद्ध भाषण.

भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजाच्या काळात प्रत्येकाने आपापल्या परीने जुलमी इंग्रजी राजवटीला विरोध केला. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपला देश स्वतंत्र आहे. या स्वांतत्र्यदिनानिमित्त पाहुया स्वातंत्र्यपूर्वे काळात गाजलेली भाषणे ज्यामुळे इंग्रज राजवटीला घाम फुटला होता.

tilak, gandhi and bose
टिळक, गांधी आणि बोस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
  • . या स्वांतत्र्यदिनानिमित्त पाहुया स्वातंत्र्यपूर्वे काळात गाजलेली भाषणे,
  • या स्वांतत्र्यदिनानिमित्त पाहुया स्वातंत्र्यपूर्वे काळात गाजलेली भाषणे

Independence Day 2022: १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य (India Get freeom) मिळाले होते. यावर्षी भारत स्वातंत्र्याचा ७५ स्वातंत्र्यदिन (75th independence day) साजरा करणार आहे. भारताच्या स्वांतत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा (har ghar tiranga) हे अभियान साजरा होत आहे. या अभियानात देशात प्रत्येक नागरिक आपल्या घरावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्य सोहळा साजरा करणार आहे. नेटकर्‍यांनीही सोशल मीडियावर आपला डीपी बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे.

अधिक वाचा : Mahabharat style Marriage : भारतातील या भागात नवऱ्याचे भाऊ ‘भाऊजी’ नव्हे ‘पतीदेव’च असतात, वाचा सविस्तर

भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रजाच्या काळात प्रत्येकाने आपापल्या परीने जुलमी इंग्रजी राजवटीला विरोध केला. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच  आज आपला देश स्वतंत्र आहे. या स्वांतत्र्यदिनानिमित्त पाहुया स्वातंत्र्यपूर्वे काळात गाजलेली भाषणे ज्यामुळे इंग्रज राजवटीला घाम फुटला होता.

अधिक वाचा : बस दरीत कोसळली, ८ विद्यार्थ्यांसह १८ जखमी

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे – लोकमान्य टिळक

बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी सहा वर्षांची कारावासाची शिक्षा भोगली. त्यानंतर १९१७ साली नाशिकमध्ये त्यांनी सिंहगर्जना केली की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्यांची ही घोषणा स्वराज्य आणि स्वातंत्र्य चळवळीत फार महत्त्वाची ठरली होती.

अधिक वाचा : Vice Presidential Election: उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते ५ मतदान, संध्याकाळी मतमोजणी आणि निकाल; एनडीएच्या धनखरांचे पारडे जड

दांडी मार्चचे भाषण – महात्मा गांधी

महात्मा गांधी यांनी ऐतिहासिक दांडी मार्च काढला होत. तेव्हा महात्मा गांधींनी इंग्लडहून आयात होणार्‍य वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आणि कर न भरण्याचा आवाहन केले होते.

अधिक वाचा : बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन येत्या 11 ऑगस्टपासून न्यू जर्सीत

तुम मुझे खून दो और मैं तुम्हें आदाजी दूंगा-  नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही घोषणा आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरली आहे. १९४४ साली नॅशनल आर्मीसमोर बर्मा देशात (आताचे म्यानमार) ही घोषणा केली होती. आजही ही घोषणा तितकीच लोकप्रिय आहे.

अधिक वाचा :  Priyanka Gandhi यांना पोलिसांनी फरपटत नेले, पाहा व्हिडिओ 

भारत छोड़ो - महात्मा गांधी  

८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडोचा नारा दिला होता. महात्मा गांधींनी गोवालिया टँक मैदानात हे भाषण दिले होते. तेव्हा या मैदानाचे नाव बदलून ऑगस्ट क्रांती मैदान असे करण्यात आले होते.

अधिक वाचा :  Article 370 : आजच्याच दिवशी रद्द झालं होतं कलम 370, तीन वर्षात किती बदलला ‘भारताचा स्वर्ग’?

ट्रिस्ट विद डेस्टिनी – पंडित जवाहरलाल नेहरू

भारताच्या पहिल्या स्वांतत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण दिले होते. आजही हे भाषण भारतीयांच्या मनात कोरलेले आहे. या भाषणात नेहरु म्हणाले होते की आम्ही नियतीसोबत चालण्याचे वचन दिले होते. आता ही वेळ आली आहे जेव्हा आपण या वचनाचे पालन करू.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी