Independence Day 2022 Flag Online: यंदा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी तिरंगा आपण सरकारी पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. 'हर घर तिरंगा' या भारत सरकारच्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून यंदा तिरंगा पोस्टाच्या indiapost.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन खरेदी करता येईल. पोस्टाच्या indiapost.gov.in या पोर्टलवर सरकारमान्य अधिकृत तिरंगा उपलब्ध आहे. हा तिरंगा आपण १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अमृत महोत्सवी वर्षातील विशेष स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यासाठी स्वतःच्या घरात किंवा फडकवू शकाल. । तिरंगा
ePostoffice या पोस्टाच्या ऑनलाईन विभागांतर्गत येणाऱ्या indiapost.gov.in या पोर्टलवर सरकारमान्य अधिकृत तिरंगा उपलब्ध आहे. ग्राहक ऑनलाईन ऑर्डन नोंदवून खरेदी करू शकतील. ऑर्डर केलेला तिरंगा संबंधित व्यक्तीच्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पाठवला जाईल. तिथून तो संबंधित व्यक्तीच्या घरी पाठवला जाईल.
ऑनलाईन झेंड्याची विक्री indiapost.gov.in या पोर्टलवर सुरू आहे. नियमानुसार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा दिलेली तिरंग्याची ऑर्डर रद्द करता येणार नाही किंवा बदलता येणार नाही. स्वातंत्र्यदिनाला आता कमी दिवस उरले आहेत. पोस्टावर अनेकांच्या घरी तिरंगा पोहोचविण्याची जबाबदारी आहे. यामुळेच झेंड्यासाठी लवकर ऑर्डर देणे हिताचे आहे. indiapost.gov.in व्यतिरिक्त Amazon, Flipkart, Myntra वर ऑनलाईन ऑर्डर करून झेंडा मागवता येईल.