Independence Day 2022 : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या सविस्तर

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वांत्र्य मिळाले होते. यंदा भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे देशाचे राष्ट्रीय उत्सव आहेत. बर्‍याच लोकांना यामधला फरक माहित नसतो. आज आपण जाणून घेऊया स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये काय फरक असतो.

indian flag
तिरंगा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वांत्र्य मिळाले होते.
  • १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे देशाचे राष्ट्रीय उत्सव आहेत.
  • जाणून घेऊया स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये काय फरक असतो.

Independence Day 2022 : मुंबई : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वांत्र्य मिळाले होते. यंदा भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे देशाचे राष्ट्रीय उत्सव आहेत. बर्‍याच लोकांना यामधला फरक माहित नसतो. आज आपण जाणून घेऊया स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये काय फरक असतो आणि आपल्या सामान्य ज्ञानात थोडी भर घालूया. (independence day and republic day difference read more for general knowledge )

अधिक वाचा : Independence Day 2022: लोकमान्य टिळक, गांधी ते सुभाषचंद्र बोस; स्वातंत्र्यापूर्वी याच भाषणांमुळे इंग्रजांना फुटला होता घाम, वाचा पाच सुप्रसिद्ध भाषण. 

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमधील फरक
 

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा इतिहास


तारखांनुसार आपण इतिहास समजून घेऊ. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणून या दिवसापासून भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर देशाच्या स्वातंत्र्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारता संविधान लागू झाले. म्हणून या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारतात संविधान लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ता राष्ट्र बनले. म्हणजेच भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये इतर कुठलाही देश हस्तक्षेप करू शकणार नाही.

अधिक वाचा : Independence Day Speech: ऐका पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ऐतिहासिक भाषण, अणुचाचणीनंतर भारताने पाकिस्तानला दिला संदेश

तिरंगा फडकावण्यातला फरक

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी दोन्ही राष्ट्रीय उत्सव आहेत. हे उत्सव साजरे करण्यातही फरक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला संपूर्ण देशात ध्वजारोहण होतं. स्वातंत्र्य दिनी झेंडा खालच्या दोरीने फडकावला जातो त्याला ध्वजारोहण म्हटले जाते.

परंतु २६ जानेवरीला प्रजासत्ताक दिनी झेंडा वरच्या बाजूला बांधला असतो आणि संपूर्ण उघडून फडकावला जातो. त्यांना झेंडा फडकावणे म्हणतात. संविधानात याचा उल्लेख असून त्याला फ्लॅग अनफर्लिंग असे म्हटले आहे.

अधिक वाचा : Happy Independence Day Images 2022: स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी Download करा हे Independence Day स्पेशल फोटो 

नेत्यांमधला फरक

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. जेव्हा देशात संविधान लागू झाले नव्हते तेव्हा देशाचे नेतृत्व पंतप्रधानांकडे होते, तेव्हापासून पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे.  २६ जानेवारी रोजी भारतात संविधान लागू झाले. संविधानानुसार देशाचे संविधानिक प्रमुख राष्ट्रपती असतात. म्हणून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती तिरंगा फडकावतात. राष्ट्रपती या दिवशी देशाला संबोधित करतात.  

अधिक वाचा : Independence Day Speech 2022: असे तयार करा स्वातंत्र्यदिनाचे भाषण

जागेचाही फरक

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण तर २६ जानेवारी रोजी तिरंगा फडकावला जातो, तेव्हा त्यात जागेचाही फरक असतो. स्वातंत्र्यादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. तर २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती दिल्लीच्या राजपथावरून तिरंगा फडकावतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी