Independence Day Speech 2022: असे तयार करा स्वातंत्र्यदिनाचे भाषण

Independence Day Speech in Marathi 2022(स्वातंत्र्यदिनाचे मराठी भाषण २०२२) : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्स साजरा होत आहे. यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे.

Independence Day Speech in Marathi
स्वातंत्र्यदिनाचे भाषण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Independence Day Speech 2022: असे तयार करा स्वातंत्र्यदिनाचे भाषण
 • स्वातंत्र्यदिनाचे भाषण छोटे, मुद्देसूद, देशाभिमान जागृत करणारे, ऐकायला सोपे पण प्रभावी शब्दांचा वापर केलेले
 • भाषणात ऐतिहासिक माहिती बिनचूक द्यावी

Independence Day Speech in Marathi 2022(स्वातंत्र्यदिनाचे मराठी भाषण २०२२) : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्स साजरा होत आहे. यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे. केंद्र सरकारने पण यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तयार सुरू आहे. भारतात घरोघरी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा' हा कार्यक्रम सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. या कार्यक्रमामुळे कोट्यवधी घरांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट या काळात तिरंगा फडकताना दिसणार आहे. । तिरंगा

राष्ट्राभिमानाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. शाळा, कॉलेजांमध्ये अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिन, राष्ट्रभक्तीशी संबंधित वेगवेगळे विषय यांच्यावर भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. आपणही या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकता. 

स्वातंत्र्यदिनाचे भाषण कसे असावे?

 1. स्वातंत्र्यदिनाचे भाषण छोटे, मुद्देसूद, देशाभिमान जागृत करणारे, ऐकायला सोपे पण प्रभावी शब्दांचा वापर केलेले असे असावे.
 2. शक्य झाले तर निवडक वाक्यांतून यमक जुळवून शब्दांचा प्रभावी वापर करावा.
 3. श्रोत्यांवर प्रभाव पडेल त्यांना शब्द लगेच समजतील आणि वाक्यांचा अर्थबोध होईल अशा प्रकारे भाषण करावे
 4. भाषणात ऐतिहासिक माहिती बिनचूक द्यावी
 5. भाषण करणाऱ्याने आधी पुरेसा सराव करून नंतर बोलण्यासाठी उभे राहावे

महत्त्वाचे मुद्दे

 1. इंग्रजांच्या जुलुमी राजवटीपासून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले
 2. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे
 3. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ला येथे तिरंगा फडकवला
 4. मोहनदास करमचंद गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, सुभाष चंद्र बोस यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे मिळाले स्वातंत्र्य, हे योगदान कधीही विसरता येणार नाही
 5. बंगाली भाषेतल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या भरोतो भाग्य बिधाताचे हिंदी भाषांतर म्हणजे जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत.
 6. भारताचे पहिले विधी व न्यायमंत्री डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर). भारताच्या संविधानाच्या रचनेत त्यांनी प्रमुख भूमिका बजावली
 7. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा. सर्वात वरच्या पट्ट्यातील केशरी रंग म्हणजे साहस आणि बलिदानाचे प्रतिक. मधला पांढऱ्या रंगाचा पट्टा म्हणजे सत्य, शांतता आणि पावित्र्याचे प्रतिक. खाली असलेला हिरव्या रंगाचा पट्टा म्हणजे समृद्धीचे प्रतिक. निळ्या रंगाचे २४ आऱ्यांचे अशोक चक्र म्हणजे धर्म नियमांचे प्रतिक.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी