India At 75 : दूध न आवडणार्‍या व्यक्तीने देशात आणला दुधाचा महापूर, ही आहे वर्गीज कुरियन यांची कहाणी

तुम्ही अमूलचे नाव ऐकले असेलच. ज्याने अमूलचा मस्का खाल्ल्ला नाही अशी व्यक्ती भारतात असूच शकत नाही. फक्त मस्काच नाही तर अमूल आपल्या डेअरी प्रोडक्ट्ससाठी ओळखला जातो. परंतु हा अमुल ब्रॅण्ड उभा करण्यात मोलाची भूमिका आहे त्यांचे नाव डॉ.वर्गीज कुरियन आहे. ज्यांना दुध फार आवडत नव्हतं त्यांनी देशात दुधाचा महापूर आणला आणि भारताला दुग्धोत्पादन करण्यात अग्रस्थानी आणले. डॉ. वर्गीज कुरियन यांना देशाचे श्वेतक्रांतीचे जनक मानले जाते.

verghese kurien
वर्गीज कुरियन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुम्ही अमूलचे नाव ऐकले असेलच. ज्याने अमूलचा मस्का खाल्ल्ला नाही अशी व्यक्ती भारतात असूच शकत नाही.
  • फक्त मस्काच नाही तर अमूल आपल्या डेअरी प्रोडक्ट्ससाठी ओळखला जातो.
  • हा अमुल ब्रॅण्ड उभा करण्यात मोलाची भूमिका आहे त्यांचे नाव डॉ.वर्गीज कुरियन आहे.

India at 75:  doctor verghese kurien : मुंबई : तुम्ही अमूलचे नाव ऐकले असेलच. ज्याने अमूलचा मस्का खाल्ल्ला नाही अशी व्यक्ती भारतात असूच शकत नाही. फक्त मस्काच नाही तर अमूल आपल्या डेअरी प्रोडक्ट्ससाठी ओळखला जातो. परंतु हा अमुल ब्रॅण्ड उभा करण्यात मोलाची भूमिका आहे त्यांचे नाव डॉ.वर्गीज कुरियन आहे. ज्यांना दुध फार आवडत नव्हतं त्यांनी देशात दुधाचा महापूर आणला आणि भारताला दुग्धोत्पादन करण्यात अग्रस्थानी आणले. डॉ. वर्गीज कुरियन यांना देशाचे श्वेतक्रांतीचे जनक मानले जाते. तसेच त्यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. (india at 75 story of man who make operation flood milk man of india doctor verghese kurien)

अधिक वाचा : Husband wife secret: आपल्या पत्नीला कधीच सांगू नका 'या' ३ गोष्टी, अन्यथा...

म्हशीच्या दुधाची पावडर

डॉ. कुरियन यांनीच देशात श्वेतक्रांती आणली. इतकेच नाही तर कुरियन यांनीच पहिल्यांदा म्हशीच्या दुधाची पावडर म्हणजेच भुकटी बनवली होती. यापूर्वी फक्त गाईच्या दुधाची भुकटी बनवली जायची. कुरियन यांचा जन्म केरळच्या कझिकोड जिल्ह्यात झाला. कुरियन यांचा जन्म एका सिरियन ख्रिश्चन कुटुंबात १९२१ साली झाला. लॉयला कॉलेजमधून १९४० साली त्यांनी पदवी पूर्ण केली. त्यानंतर चेन्नईच्या गिंडी कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते.

अधिक वाचा : Independence Day 2022 : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या सविस्तर

भारत सरकारकडून स्कॉलरशिप

शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुरियन यांना भारत सरकारकडून स्कॉलरशिप मिळाली होती. त्यांना डेअरी इंजिनियरिंगमधून शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती मिळाली होती. १९४८ साली मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतून कुरियन यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर डीग्री पूर्ण केली. यात कुरियन यांनी डेअरी इंजीनिअरिंगचा अभ्यासही केला होता.

अधिक वाचा : VASTU TIPS: चुकीच्या दिशेने घड्याळ लावल्यास, शुभ वेळ आपल्याकडे करते पाठ, संपत्ती हवी तर लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

अमूलचे नामकरण

डॉ. वर्गीज कुरियन यांनी १४ डिसेंबर १९४६ साली कैरा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ समितीचा पाया रचला होता. काँग्रेस नेते त्रिभूवन दास यांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्या या संस्थेचे संचालक होते. डॉ. कुरियन या समितीचे नाव छोटं ठेवण्याच्या विचारात होते. यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा कर्मचार्‍यंनी अमूल्य असे नाव सुचवले. अमूल्य म्हणजेच अनमोल, त्यानंतर या सहकारी संस्थेचे नाव अमूल ठेवण्यात आले. या काळात अमूलला मोठे यश मिळाले. या संस्थेचे यश पाहता १९६५ साली तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशातल्या इतर भागात अमूल मॉडेल लागू करण्याची योजना आखली होती. तेव्हा राष्ट्रीय दुग्ध बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि डॉ. कुरियन यांना या बोर्डाचे अध्यक्ष करण्यात आले होते.   

अधिक वाचा : Independence Day 2022: 15 ऑगस्टला मुलांना टिफिनमध्ये द्या टेस्टी रेनबो सँडविच, जाणून घ्या सोपी रेसिपी

श्वेतक्रांतीचे जनक डॉ. कुरियन

१९७० साली ऑपरेशन फ्लडची सुरूवात झाली. यात डेअरी व्यवसायासंबंधित शेतकर्‍यांना मदत करण्यात आली. सर्व व्यवसायाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. राष्ट्रीय दुग्ध ग्रीड देशाच्या दुध उत्पादक ७०० हून अधिक शहर आणि ग्राहकांन जोडतं. कुरियन यांनीच अमूलची स्थापना केली होती. अमूलच्या स्थापनेनंतरच देशात दुधाचा महापूर आला असे सांगण्यात येतं.  

मिल्कमॅन ऑफ इंडिया

डॉ. कुरियन यांनी श्वेतक्रांती आणली परंतु त्यांना फार दूध आवडत नव्हते. देशाचे मिल्कमॅन म्हनूण ओळखले जाणारे कुरियन यांना दुध किंवा दुधाचे पदार्थ फार आवडत नव्हते. मला दूध फार आवडत नाही म्हणून मी दूध पीत नाही असे कुरियन एकदा म्हणाले होते.

अधिक वाचा : Skin Care Tips: यंदा रक्षाबंधनाचा वाचवा पार्लर खर्च, 'या' घरगुती Beauty Tips मिळवा एक नंबर Glowing Skin

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी