Independence Day: म्हणून भारतातील या राज्यांत साजरा होत नाही स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या कारण

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांनी भारतावर तब्बल दीडशे वर्ष राज्य केले आणि अखेर १५ ऑगस्ट रोजी भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाले. यंदा भारत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पण भारतातील अशी काही राज्य आहेत तिथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. त्यात गोवा या राज्याचा समावेश आहे. जाणून घेऊया गोवा आणि कुठल्या राज्यांत स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही आणि त्यामागील कारण.

independence day
भारतीय स्वातंत्र्य दिन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • पण भारतातील अशी काही राज्य आहेत तिथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही.
  • जाणून घेऊया गोवा आणि कुठल्या राज्यांत स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही आणि त्यामागील कारण.

Independence Day : मुंबई : १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांनी भारतावर तब्बल दीडशे वर्ष राज्य केले आणि अखेर १५ ऑगस्ट रोजी भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाले. यंदा भारत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पण भारतातील अशी काही राज्य आहेत तिथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. त्यात गोवा या राज्याचा समावेश आहे. जाणून घेऊया गोवा आणि कुठल्या राज्यांत स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही आणि त्यामागील कारण. 

अधिक वाचा : Happy Independence Day Images 2022: स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी Download करा हे Independence Day स्पेशल फोटो 


म्हणून गोव्यात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारतातील गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. म्हणून गोव्यात १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा होत नाही. गोव्यात पोर्तुगीजांनी जवळ जवळ ४०० वर्षे राज्य केले. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १४ वर्षानंतर गोव्याला पोर्तुगीजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. १५१० साली अलफान्सो द अल्बकुर्कने गोव्यावर हल्ला केला होता तेव्हापासून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने पोर्तुगीजांसोबत चर्चा करून गोवा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोर्तुगीजांनी त्याला नकार दिला.  गोव्यातून पोर्तुगीज सरकार मसाल्यांचे व्यापार करत होते, हा व्यापार त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर होता. म्हणून त्यांना गोवा सोडायचे नव्हते.

अधिक वाचा : Lokmanya Tilak Birth Anniversary : जेव्हा महंमद अली जिनांनी घेतले होते लोकमान्य टिळकांचे वकीलपत्र 

१९६१ गोवा झाला पोर्तुगीजमुक्त

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा मुक्तिसंग्राम सुरू झाला. परंतु पोर्तुगीज देश सोडण्यास तयार नव्हते. तसेच भारत सरकार आणि पोर्तुगीज सरकारमधील चर्चा फिसकटत होती. अखेर भारत सरकारने गोवा स्वतंत्र्य करण्यासाठी लष्कर पाठवले आणि युद्धाची तयारी केली. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांकडून स्वतंत्र झाले आणि भारतात विलीन झाले. हा दिवस गोवा मुक्तिसंग्राम म्हणून ओळखला जातो. 

अधिक वाचा : Lokmanya Tilak Birth Anniversary 2022 : ज्या लेखनासाठी टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली त्यातले बहुतांश लेखन नव्हतेच टिळकांचे

हैदराबाद

ब्रिटिश काळात हैदाराबाद नावाचे राज्य होते, त्यात मराठवाड्याचाही समावेश होता. या हैदराबात राज्यात निजामांचे राज्य होते. भारताची फाळणी झाल्यानंतर निजामाने दोन्ही देशांच्या संविधान सभेत भाग घेण्यास नकार दिला होता. तसेच भारतात सामील होण्यासही निजामाचा विरोध होता. उलट हैदराबाद राज्यातील जनतेचा कौल भारतात विलीन होण्याकडे होता. हैदराबाद भारतात विलीन होत नसल्याने अखेर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई केली. १३ सप्टेंबर १९४८ साली भारत सरकारने ऑपरेशन पोलो राबवले आणि हैद्राबाद भारतात विलीन करून घेतले. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही एक वर्षांहून अधिक काळ हैद्राबद स्वतंत्र राज्य होते. 

अधिक वाचा : August Holidays: ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस; 'या' ठिकाणी फिरण्याचं करू शकता प्लॅनिंग  

भोपाळ

भोपाळ राज्याने आधी भारतात विलीन होण्यास नकार दिला. भोपाळचा नवाब  हमीदुल्लाह खान पाकिस्तानात पळून गेले. तसेच भोपाळ पाकिस्तानात सामील व्हावे अशी नवाबांची भूमिका होती. हमीदुल्ला खान हे मोहम्मद अली जिना यांच्या जवळचे होते आणि चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये त्यांचा दबदबा असल्यामुळे अखेर भोपाळ १ मे १९४९ रोजी भारतात विलीन झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी