Today in History Thursday, 11th August 2022 : आज आहे क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा स्मृतीदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा स्मृतीदिन
 • आजच्या दिवशी दादरा नगर हवेली हा भाग भारतात विलीन झाला.
 • आज आहे लेखक आणि पत्रकार वि.स. वाळींबे यांचा जन्मदिन

Today in History: Thursday, 11th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  

अधिक वाचा : Independence Day 2022: 15 ऑगस्टला मुलांना टिफिनमध्ये द्या टेस्टी रेनबो सँडविच, जाणून घ्या सोपी रेसिपी 


११ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९५४: यशपाल शर्मा - भारतीय क्रिकेटपटू
 2. १९५०: स्टीव्ह वोजनियाक - ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक
 3. १९४४: फ्रेडरिक स्मिथ - फेडएक्सचे संस्थापक
 4. १९४३: जनरल परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष
 5. १९३३: जेरी फेलवेल - लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक (निधन: १५ मे २००७)
 6. १९२८: रामाश्रेय झा - शास्त्रीय संगीतकार, वादक - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १ जानेवारी २००९)
 7. १९२८: वि. स. वाळिंबे - लेखक व पत्रकार (निधन: २२ फेब्रुवारी २०००)
 8. १९११: प्रेम भाटिया - पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (निधन: ८ मे १९९५)
 9. १८९७: एनिड ब्लायटन - इंग्लिश लेखिका (निधन: २८ नोव्हेंबर १९६८) 

अधिक वाचा : Skin Care Tips: यंदा रक्षाबंधनाचा वाचवा पार्लर खर्च, 'या' घरगुती Beauty Tips मिळवा एक नंबर Glowing Skin


११ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
 2. २००३: नाटो (NATO) - अफगाणिस्तानमधील शांती सैन्याची कमान हाती घेतली, ते नाटोचे ५४ वर्षांच्या इतिहासात युरोपबाहेरील पहिले मोठे ऑपरेशन आहे.
 3. १९९९: परिमार्जन नेगी - राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत सहा वर्षे वय असताना विजेतेपद जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
 4. १९९२: मॉल ऑफ अमेरिका - त्यावेळी अमेरिका देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल ब्लूमिंग्टन, मिनेसोटा येथे उघडला.
 5. १९७९: मोर्वी, गुजरात धरणफुटी दुर्घटना - किमान हजारो लोकांचे निधन.
 6. १९७२: व्हिएतनाम युद्ध - अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने दक्षिण व्हिएतनाम सोडले.
 7. १९६२: व्होस्टोक ३ - सोव्हियेत युनियनचे अंतराळयान प्रशक्षेपित केले.
 8. १९६२: अँड्रियन निकोलायेव - अंतराळवीर मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती बनले.
 9. १९६१: दादरा व नगर हवेली - भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
 10. १९६०: चाड - देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 11. १९५९: शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ, रशिया - रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ उघडले.
 12. १९५२: हुसेन बिन तलाल - जॉर्डनचे राजा बनले.
 13. १९४३: सी. डी. देशमुख - रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
 14. १९२९: बेब रुथ - हे ५०० होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू बनले.
 15. १९१८: पहिले महायुद्ध - एमियन्सची लढाई: संपली.
 16. इ.स.पू. ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर - सुरु झाले.

अधिक वाचा : Independence Day: म्हणून भारतातील या राज्यांत साजरा होत नाही स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या कारण

११ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २०१३: जफर फटहॅली - भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक (जन्म: १९ मार्च १९२०)
 2. २००३: अर्मांड बोरेल - स्विस गणितज्ञ (जन्म: २१ मे १९२३)
 3. २०००: पी. जयराज - भारतीय अभिनेते - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
 4. १९९९: रामनाथ पारकर - क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)
 5. १९७०: इरावती कर्वे - मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १५ डिसेंबर १९०५)
 6. १९०८: खुदिराम बोस - क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी