Winter Travel Destinations: डिसेंबर महिन्यात सहलीला जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं, आयुष्यभर राहतील आठवणी

थंडगार हवा आणि फिरण्यासाठी पोषक वातावरण डिसेंबर महिन्यात असतं. शिवाय वर्षाच्या सुट्ट्या घेण्याचाही हा काळ असतो. त्यामुळे या काळात फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्हीही करत असाल, तर त्यासाठी भारतातील काही उत्तम पर्याय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी सहल काढणं हा आयुष्यभरासाठी एक उत्तम अनुभव ठरू शकतो.

Winter Travel Destinations
डिसेंबर महिन्यात सहलीला जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात पर्यटनासाठी भारतात अनेक पर्याय
  • कमी थंडी असलेल्या ठिकाणांनाही देऊ शकता पसंती
  • तुमच्या मूडप्रमाणे निवडा पर्यटनाचे ठिकाण

Winter Travel Destinations: लवकरच 2022 हे वर्ष संपत असून नव्या वर्षात (New year) आपण सगळे  पदार्पण करणार आहोत. वर्षाचा शेवटचा महिना हा फिरण्याचा आणि पर्यटनाचा (Tourism) महिना समजला जातो. थंडगार हवा आणि फिरण्यासाठी पोषक वातावरण डिसेंबर महिन्यात असतं. शिवाय वर्षाच्या सुट्ट्या घेण्याचाही हा काळ असतो. त्यामुळे या काळात फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्हीही करत असाल, तर त्यासाठी भारतातील काही उत्तम पर्याय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी सहल काढणं हा आयुष्यभरासाठी एक उत्तम अनुभव ठरू शकतो. जाणून घेऊया, भारतातील सहलीसाठी सर्वोत्तम मानली जाणारी काही चांगली ठिकाणी. 

औली

औली हे उत्तराखंडमधील एक सर्वोत्तम ठिकाण आहे. याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असंही म्हटलं जातं. औलीमध्ये फिरण्यासाठी उत्तमोत्तम ठिकाणं आहेत. जर या हिवाळ्यात तुम्ही औलीला जाण्याचा बेत आखत असाल तर तिथं अनेक धमाल ॲक्टिविटीजचा तुम्ही आनंद घेऊ शकता. बर्फाच्छादित डोंगर पाहणं हादेखील एक अद्भूत अनुभव ठरू शकतो. 

गोवा

गोवा हे बहुतांश पर्यटकांचं ड्रिम डेस्टिनेशन असतं. जर तुम्हाला जास्त थंडी सहन होत नसेल, तर तुमच्यासाठी गोवा हा उत्तम पर्याय आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर गोव्यात धुमधडाक्यात साजरं केलं जातं. त्यामुळे डिसेंबर महिन्यात गोव्यात देशी आणि विदेशी पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. या काळात गोव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स मिळतात आणि उत्तम प्रतिच्या माशांचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

अधिक वाचा - Rajasthan Tour Package: आयआरसीटीसीच्या टूरमधून जयपूरसोबत पाहा ही शहरं, वाचा खर्च आणि इतर माहिती

रण आणि कच्छ

जर तुम्हाला एखाद्या अनवट ठिकाणी फिरायला जायची इच्छा असेल तर रण आणि कच्छ हा एक उत्तम पर्याय ठरेल. इथं चारही बाजूंना केवळ पांढरी जमीन तुम्ही पाहू शकता. प्रत्यक्षात हे सर्व मीठ असतं. दरवर्षी नोव्हेंबरपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत इथं रण महोत्सव साजरा केला जातो. यात कला, संस्कृती आणि संगीत यांचा अनोखा संगम पाहता येतो. वाळवंटात उंटाची स्वारी कऱण्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. 

अलेप्पी

केरळ ही देवभूमी मानली जाते. केरळमधील अलेप्पी हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतं. इथलं बॅकवॉटर हाऊसबोट हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे. हाऊसबोटमध्ये एक रात्र घालवणं, हा एक अद्भूत अनुभव असतो. अलेप्पीला गेल्यानंतर तिथून जवळच असणारी मुन्नार आणि तेकडी ही ठिकाणंही तुम्ही पाहू शकता. 

अधिक वाचा - Vastu Tips for Negative Energy: नकारात्मक ऊर्जेमुळे घरात निर्माण होतात समस्या, वापरा या वास्तुशास्त्राच्या टिप्स

मनाली

मनाली हे ठिकाण पर्यटनाची आवड असणाऱ्या प्रत्येकालाच माहित असतं. सर्व ऋतुंमध्ये हे ठिकाण पर्यटकांनी फुलून गेलेलं असतं. थंडीच्या काळात या जागेच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. 

तवांग

जर तुम्हाला थोड्याशा हटके जागी जाण्याची इच्छा असेल तर तवांग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नॉर्थइस्ट भागातील तवांग हे एक नितांत सुंदर ठिकाण आहे. 

पुदुच्चेरी

मनोहारी अशा लँडस्केपसाठी प्रसिद्ध असणारं पुदुच्चेरी हे पर्यटकांचं लाडकं ठिकाण. भारताची संस्कृती आणि निसर्ग यांचा आनंद लुटायचा असेल, तर या ठिकाणाची निवड तुम्ही करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी