Honeymoon Destination India : हिवाळ्यात हनीमूनसाठी जाताय? भारतात हे आहेत बेस्ट हनीमून डेस्टिनेश 

Winter Honeymoon Destination in India : नुकतंच पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. आता लग्नाचे मुहुर्तही मोठ्या प्रमाणात असतात. अनेकांची लग्नाची तारीख ठरली असेल तर काहींनी आपल्या हनीमून डेस्टिनेशनही ठरवले असतील. काही जण मालदिव, युरोप आणि बालीला हनीमूनला जातात. परंतु भारतातही उत्तम हनीमून डेस्टिनेशन्स आहेत. आपल्या जोडीदाराला तिथे नेऊ शकता आणि चांगले रोमॅंटिक क्षण घालवू शकता.

indias best honeymoon destination
 फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुकतंच पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. आता लग्नाचे मुहुर्तही मोठ्या प्रमाणात असतात
  • अनेकांची लग्नाची तारीख ठरली असेल तर काहींनी आपल्या हनीमून डेस्टिनेशनही ठरवले असतील.
  • भारतातही उत्तम हनीमून डेस्टिनेशन्स आहेत. आपल्या जोडीदाराला तिथे नेऊ शकता आणि चांगले रोमॅंटिक क्षण घालवू शकता.

Winter Honeymoon Destination in India : नुकतंच पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. आता लग्नाचे मुहुर्तही मोठ्या प्रमाणात असतात. अनेकांची लग्नाची तारीख ठरली असेल तर काहींनी आपल्या हनीमून डेस्टिनेशनही ठरवले असतील. काही जण मालदिव, युरोप आणि बालीला हनीमूनला जातात. परंतु भारतातही उत्तम हनीमून डेस्टिनेशन्स आहेत. आपल्या जोडीदाराला तिथे नेऊ शकता आणि चांगले रोमॅंटिक क्षण घालवू शकता. जाणून घेऊया या हनीमून डेस्टिनेशनबद्दल. (indiast best winter honeymoon destination budget and romantic places)

अधिक वाचा : एकांतात असाल तरच पाहा या बोल्ड वेब सीरिज

दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे एक हिल स्टेशन आहे. थंडीच्या दिवसात दार्जिलिंगचे वातावरण एकदम रोमॅंटिक होऊन जातं. आता तापल्या जोडीदारासोबत तुम्ही दार्जिलिंगला जाऊ शकता. तिथे चहाच्या मळ्यात तुम्ही फेरफटका मारू शकता. इतकेच नाही तर दार्जिलिंगच्या टॉय ट्रेन मध्ये प्रवास करू शकता. 

अधिक वाचा : IndiGo Flight: टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग, आगीच्या ठिणग्या दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग

ऊटी, तमिळनाडू

दक्षिण भारतात जे काही सुंदर पर्यटन स्थळ आहेत त्यात ऊटीचे नाव सर्वात वर आहे. अनेक कपल्सचे ऊटी हे आवडते ठिकाण आहे. ऊटी नैसर्गिकदृष्ट्या संपन्न ठिकाण आहे. या ठिकाणी सुर्यास्त बघण्याची एक वेगळीच पर्वणी असते. इथे लॉंग वॉक करत तुम्ही आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. 

अधिक वाचा : Husband wife relationship: पत्नीला अजिबात आवडत नाहीत पतीच्या ‘या’ सवयी, आजपासूनच करा बंद


मुन्नार, केरळ

केरळ राज्य हे निसर्ग संपन्न राज्य आहे. या राज्यातील मुन्नार हे ठिकाण अतिशय सुंदर आणि रोमँटिक आहे. मुन्नारमध्ये तुम्ही आपल्या पार्टर्नरसोबत ट्रेकिंग, बोटिंग, रॉक क्लायबिंग करून चहाच्या मळ्यात फेरफटका मारू शकता. 

 

अधिक वाचा :  Rats control: ठार न मारता घरातील उंदीर लावा पळवून, करा ‘हे’ पाच उपाय


अंदमान बेट

समुद्र किनारी हनीमून साजरा करण्यासाठी अंदमानचा चांगला पर्याय आहे. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर आणि हेवलॉक हा परफेक्ट हनीमून स्पॉट मानला जातो. इथे तुम्ही समुद्र किनारी फिरू शकता. तसेच पर्यटकांसाठी अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी