यंदा सणासुदींमध्ये आपल्या घराचे मेकओव्हर कसे कराल?

लाइफफंडा
Updated Oct 09, 2019 | 19:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

यंदा सणासुदींमध्ये आपल्या घराचे मेकओव्हर कसे कराल या संदर्भात गोदरेज इंटेरिओचे जनरल मॅनेजर-डिझाईन ललितेश मांद्रेकर यांनी सांगितल्या काही टिप्स 

interior design for festival by godraj news in marathi google news
यंदा सणासुदींमध्ये आपल्या घराचे मेकओव्हर कसे कराल?  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • गोदरेज इंटेरिओचे जनरल मॅनेजर-डिझाईन ललितेश मांद्रेकर यांनी सांगितल्या काही टिप्स 
  • सणांदरम्यान नव्या वस्तू, शैली घरात आणून घराचे रूपडे बदलून टाका.
  • तुमचे घर अधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी पुढे काही कल्पना दिल्या आहेत

मुंबई : यंदा सणासुदीला, जुन्या झालेल्या, गुलाबी, रोझ-गोल्ड अॅक्सेसरीजना व कळकटलेल्या जागांना निरोप द्या आणि सणांदरम्यान नव्या वस्तू, शैली घरात आणून घराचे रूपडे बदलून टाका. मनासारखे दिवे बसवणे असो किंवा अँटिक दिसणाऱ्या काही गोष्टी आणणे असो, तुमच्या घराला नवी ऐट देण्यासाठी सज्ज व्हा.  

सणासुदीचे दिवस म्हणजे रोजच्या धकाधकीतून थोडी विश्रांती घेण्याचा आणि स्वतःसाठी वेळ देण्याचा काळ असतो. सणांच्या दरम्यान कुटुंबीयांसाठी थोडासा वेळ काढाच, शिवाय तुमच्या घरासाठीही वेळ ठेवा. संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे सण साजरे करायचे असतात, शिवाय एकत्रितपणे घर सजवायचे असते. तुमचे घर अधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी पुढे काही कल्पना दिल्या आहेत, गोदरेज इंटेरिओचे जनरल मॅनेजर-डिझाईन ललितेश मांद्रेकर यांनी

टेराझ्झो कालावधी  

रेट्रो टेराझ्झोचा ट्रेंड पुन्हा आला आहे आणि तो टिकून राहणार आहे. चकित करणाऱ्या पॅटर्नपासून व्हेनेटाइन डिझाइनपर्यंत विविधता विचारात घेता, ही डिझाइन तुमचे घर आकर्षक बनवतात. तुमच्या स्वयंपाकघरातील ओट्याचे रूप बदला आणि तो अधिक देखणा करा. त्यासाठी कोस्टर्स, डिश व स्टूल्स अशा टेराझ्झो वस्तू वापरा. 

शाश्वत शैली

कंपनीतील नैसर्गिक व पर्यावरण-सॅव्ही टाइल्स, कॉइर मॅट, बाम्बू चेअर्स व रॅटन दिवे, तसेच घराचे सौंदर्य वाढवणारी रोपे यांचे चित्र डोळ्यांसमोर आणा. ही संदर झाडे हवेतील प्रदूषके शोषून घेतात. तसेच, यामुळे तुम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी योगदान देता. तुमच्या आवडीच्या मालिका पाहत असताना निवांत होण्यासाठी ही नवी शैली तुमच्या घराला नवा आयाम देईल.

आकर्षक रंगछटा

यंदाच्या सणासुदीमध्ये मोनोक्रोम स्कीम ठळकपणे दिसत आहेत. पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर रंगांची उधळण करा. वॉल हँगिंग, कुशन, पडदे व कारपेट यांच्यावर निरनिराळे रंग वापरा आणि सौम्य भिंती व बेडिंग ठेवा. खोलीत निर्माण झालेल्या निरनिराळ्या छटा व पोत यामुळे खोलीला विशिष्ट रूप प्राप्त होईल व त्यामध्ये तुमचे प्रतिबिंबही दिसून येईल. 

आलीशान

तुमच्या वीकेंडसाठी खास वेल्वेट हेडबोर्डस, ब्लश चेअर व ड्रिंक ट्रॉली यांचा वापर करून तुमच्या घराला नवी झळाळी द्या. आकर्षक शँडलिअर्स, कॉपर डिनरवेअर व जिन ग्लासेस याद्वारे घराला ऐटदार रूप द्या. तुम्हाला आणखी उत्साह असेल तर तुमच्या रेस्टरूमला मार्बलचा मेकओव्हर करा. त्यासाठी गोल्ड फिटिंग वापरा. त्यामुळे रेस्टरूमचा वापर करताना आणखी चैतन्य वाटेल.

मल्टि-स्पेसेस 

सोशल स्पेस व स्पेस सेव्हिंग हे सध्या नवे ट्रेंड आहेत. घरांचे आकार कमी होत असल्याने जगभरातील डिझाइनरनी डिझाइनमध्ये नावीन्य आणून जागेच विविध प्रकारे वापर सुरू केला आहे. तुम्ही मित्रमंडळीचे आगत्याने स्वगत करत असल्याने सर्वांमध्ये लोकप्रिय असल्याने, लिव्हिंग रूमचे रूपांत बेडरूममध्ये व बेडरूमचे लिव्हिंग रूममध्ये करू शकेल अशा ट्रान्सपोज फर्निचरचा वापर करून तुमच्या लिव्हिंग रूमला आधुनिक स्वरूप द्या.  

प्राचीन वस्तू

डिस्प्ले युनिटमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्याकडील वैभव मिरवा; मग त्यामध्ये तुम्ही कष्टाने मिळवलेला संग्रह असेल किंवा तुमच्या आवडीच्या अन्य गोष्टी. डिस्प्ले आकर्षक दिसण्यासाठी त्यामध्ये पुस्तके, कँडलब्रास व सुंदर लिली यांचा समावेश करा. तुम्हाला अविस्मरणीय व स्मृतिपर वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असेल तर रिकाम्या भिंती व कोपरे यांना जुन्या काळातील टाइपराइटर व ब्रास एअरप्लेन यांनी सचेतन करा. 

सणासुदीच्या दिवसांत घराची रंगरंगोटी सजावट केली जाते आणि कुटुंबीयांबरोबर वेळ व्यतित केला जातो. या दिवसांत सगळ्या महत्त्वाच्या कामांसाठी वेळ काढला जातो आणि सण साजरे करण्यासाठी ‘मेक स्पेस फॉर लाइफ’मुळे तुमचे घर हे आदर्श ठिकाण बनते. तुमच्या आवडत्या डायनिंग जागेत अविस्मरणीय आठवणी निर्माण करा, तुमची आवडती गाणी ऐका आणि घरातच थांबण्याचा आनंद अनुभवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, नव्या गोष्टींचे स्वागत करत असताना जुन्या काही गोष्टी हद्दपार करण्याचे धैर्य मात्र नक्की दाखवा. घर निटनेटके असेल तर जागेचा वापर उत्तम प्रकारे होतो व जागा अधिक मोठी दिसते आणि उरलेले संपूर्ण वर्ष चांगले जाण्यासाठी ती आकर्षक दिसते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी