International Consumer Rights Day Date, Reason behind International Consumer Rights Day celebration? What is the history of International Consumer Rights Day? : ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांच्या गरजा या संदर्भात जगभर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करतात. यंदा बुधवार 15 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे.
आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन अर्थात आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा करणे ही सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी करण्याची आणि बाजारातील गैरवर्तन आणि ग्राहकांच्या अधिकारांना कमी करणाऱ्या सामाजिक अन्यायाचा निषेध करण्याची संधी आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांनी 15 मार्च 1962 रोजी यूएस काँग्रेसला उद्देशून बोलताना ग्राहक हक्कांचा मुद्दा ठळकपणे मांडला. सुरक्षिततेचा अधिकार, निवडण्याचा अधिकार, ऐकण्याचा अधिकार, माहितीचा अधिकार हे ग्राहकांचे चार हक्क असल्याचे केनेडी म्हणाले.
ग्राहकांच्या हक्कांविषयी बोलणारे जॉन एफ केनेडी हे पहिले जागतिक पातळीवरील महत्त्वाचे नेते होते. या घटनेची आठवण म्हणून 1983 पासून दरवर्षी 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन अर्थात आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय कन्झ्युमर्स इंटरनॅशनल या संघटनेने घेतला.
कन्झ्युमर्स इंटरनॅशनल अर्थात आंतरराष्ट्रीय ग्राहक महासंघ. या संघटनेची स्थापना 1960 मध्ये झाली. संघटनेने ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन अर्थात आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
यंदा स्वच्छ ऊर्जा संक्रमण ही आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची संकल्पना (आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची थीम) आहे.
उन्हाळ्यात सत्तू खाण्याचे फायदे