International Men’s Day 2021: आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास, विषय, प्रसिद्ध Quotes आणि शुभेच्छा

International Men’s Day 2021: जाणून घ्या हा दिवस साजरा करण्यामागे काय आहे इतिहास, या वर्षाची या दिवसासाठीचा विषय आणि या खास शुभेच्छा आणि कोट्सनी तुमच्या जीवनातील पुरुषांचा दिवस साजरा करा.

international mens day 2021 read to know the-history theme quotes and wishes
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास, विषय, प्रसिद्ध Quotes आणि 
थोडं पण कामाचं
 • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
 • आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस २०२१ विशेष
 • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त प्रसिद्ध कोट्स

international mens day 2021 । मुंबई: दरवर्षी (Annual) १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men’s Day) साजरा (celebration) केला जातो. हा दिवस पुरुष (men) आणि मुलांनी (boys) देशासाठी (nation), समाजासाठी (society), कुटुंबासाठी (family), विवाहसंबंधांसाठी (marriage) आणि संततीच्या देखभालीसाठी (child care) दिलेले योगदान (contribution) अधोरेखित (appreciation) करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे अंतिम लक्ष्य (ultimate goal) मूलभूत मानवी मूल्ये (basic human values) रुजवणे (inculcation) हा आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास

हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९९२ साली ७ फेब्रुवारी रोजी थॉमल ओस्टर यांच्या हस्ते जेरोम तीलकसिंग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाली. त्यांनी १९ नोव्हेंबरचा दिवस आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ निवडला. याच दिवशी १९८९ साली त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या फुटबॉल संघांनी त्यांच्या प्रयत्नांनी विश्वचषकात देशाला प्रवेश मिळवून देण्यासाठी दोन्ही देशांना एकत्र आणलं होतं हेही या दिवसाचे महत्व आहे. भारतात १९ नोव्हेंबर २००७ रोजी इंडियन फॅमिली या पुरुषहक्क संघटना हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. (international mens day 2021 read to know the-history theme quotes and wishes )

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त प्रसिद्ध वक्तव्ये (famous Quotes) 

 1. एक पुरुष त्याने जे करायला हवे ते करतो- व्यक्तिगत परिणामांची पर्वा न करता, अनेक अडचणी, धोके आणि तणावांचा सामना करत- आणि हेच मानवी नैतिकतेचे मूळ आहे. – जॉन एफ. केनेडी.
 2. पुरुष म्हणून जन्माला येणे हे नैसर्गिक असते. पुरुष होणे हे वयावर अवलंबून असते. मात्र सत्पुरुष होणे हा प्रत्येकाच्या निवडीवरून ठरते. – विन डीजेल.
 3. एका पुरुषाने वेळप्रसंगी, स्वतःबाबतच्या सत्याला सामोरे जाताना पोलादासारखे कठीण असावे. पण त्याने मृदूही असावे. स्त्रीच्या संतापाचे चिलखत हे पुरुषाच्या मृदुतेनेच भेदता येते. – एलिझाबेथ इलियट.
 4. चांगला पुरुष हा अयोग्य मार्गांनी अन्यायाला हरवण्यापेक्षा हार स्वीकारणे पसंत करेल. – सॅलस्ट.
 5. एक यशस्वी पुरुष होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक सद्गुणी पुरुष होण्याचा प्रयत्न करावा. – अल्बर्ट आईनस्टाईन.
 6. पण हे लक्षात घ्या. पुरुष हे मंगळावरून आलेले नाहीत. स्त्रिया या शुक्रावरून आलेल्या नाहीत. सर्वजण सर्वकाही आहेत. तारेतारकांमध्ये असणारे सर्वकाही तुमच्यातही आहे आणि अस्तित्वात असलेली कोणतीही व्यक्ती ही तुमच्या मस्तकातील रंगमंचावर प्रमुख भूमिकेसाठी स्पर्धेत असते. – मॅट हेग.
 7.  

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा

 1. चांगल्या पुरुषांवरचा माझा विश्वास कायम ठेवल्याबद्दल आभार. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
 2. एक चांगला पुरुष इतर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात याची पर्वा करत नाही. जे योग्य आहे आणि जे त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रेमाच्या माणसांसाठी चांगले आहे ते तो करतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
 3. पुरुष ही देवाची सुंदर निर्मिती आहे, मात्र ती परिपूर्ण नाही. त्यांच्यातही अनेक चुका असणे हा सामान्य आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
 4. एका पुरुषाला आपल्या आतील शक्ती दाखवण्यासाठी शारीरिक ताकद लावण्याची काहीच गरज नसते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना न घाबरता तोंड देणे हे महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
 5. ज्यांनी या अतिमहत्वाकांक्षी जगातून सर्व अडचणींवर मात करून स्वतःचे मार्ग तयार केले आहेत त्या सर्व पुरुषांना सलाम. तुम्हाला सर्व प्रेम आणि शक्ती लाभो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
 6. पुरुषांमधील सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे त्यांच्या मनाशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येकाकडे असलेला एक विशेष गुण गवसतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी