Women's Day 2021: गूगल डूडलद्वारे  खास अंदाजात साजरा केला महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने गुगलने डूडल बनवून महिलांप्रति आदर व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने गुगलने महिला शक्तीला समर्पित खास डूडल तयार केले.

international womens day 2021 google doodles animated video showing women power and their contribution
Women's Day 2021: गूगल डूडलद्वारे  खास अंदाजात साजरा केला महिला दिन   |  फोटो सौजन्य: Google Play

थोडं पण कामाचं

  • अ‍ॅनिमेटेड व्हिडिओंमध्ये महिला शक्तीची झलक पहा
  • आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने गुगलने डूडल बनवून महिलांप्रति आदर व्यक्त केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने गुगलने महिला शक्तीला समर्पित खास डूडल तयार केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021(International Women's Day 2021 ) : आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने गुगलने डूडल बनवून महिलांप्रति आदर व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने गुगलने महिला शक्तीला समर्पित खास डूडल तयार केले. या डूडलमध्ये (गूगल डूडल) एक व्हिडिओ देखील शेअर केला गेला आहे. या अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमध्ये महिलांच्या वेगवेगळ्या भूमिकांवर जोर देण्यात आला आहे. व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, महिला प्रत्येक जबाबदारी पार पाडत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात त्या पताका फडकवत आहेत.  या व्हिडिओमध्ये महिला विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे दिसून येत आहे.


या अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमध्ये आपल्याला महिला शक्तीची झलक मिळत आहे.  महिलांनी जमिनीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उंचावला आहेत  तसेच अंतराळातही आपल्या हिमतीवर प्रवास केला आहे. हा व्हिडिओ खूप खास आहे, ज्यामध्ये महिलांना समाजाचे नेतृत्व करताना दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या अनेक भूमिका दाखविणारे हे डूडल समाजातील स्त्रियांची शक्ती आणि सामर्थ्य सांगत आहे.


व्हिडिओमध्ये, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने, डूडलने इतिहासातील अग्रगण्य स्त्रियांची कहाणी दर्शविली आहे ज्यांनी त्यावेळी सर्व आव्हानांवर मात केली आणि शिक्षण, नागरी हक्क, विज्ञान, कला, अंतराळसह सर्व क्षेत्रात इतिहास रचला. गुगलने या महिलांना आदर दिला आहे. गुगलने प्रत्येक महिलेला तिच्या योगदानाबद्दल आदरांजली वाहिली आहेत


दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील दिवस म्हणजे विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा आदर दर्शविण्याचा दिवस. या दिवशी महिलांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित केले जाते. हा दिवस जगभर मोठ्याने साजरा केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी