International Women's Day Speech in Marathi, Jagtik mahila din bhashan marathi, Jagtik mahila diswas bhashan marathi : दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस बुधवार 8 मार्च 2023 रोजी आहे. महिला दिनानिमित्त अनेकदा शाळेत वक्तृत्व स्पर्धा (भाषण स्पर्धा), निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत महिला दिनाशी संबंधित माहितीचा आपण उपयोग करू शकता. यासाठीच हे जागतिक महिला दिनाचे मराठी भाषण...
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय महिला दिनी माई, ताईला द्या शुभेच्छा
ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय महिला दिन शुभेच्छा करा शेअर
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी महिला ही असतेच. अशा या नारीशक्तीला मानाचा मुजरा.
मान्यवर, गुरुजन वर्ग, उपस्थित विद्यार्थी मित्र आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो...
शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व
दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.
इतिहासात डोकावलात तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. नंतर 1910 मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला. यानंतर दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
जागतिक महिला दिन 2023 साठी Innovation and technology for gender equality अर्थात लैंगिक समानतेसाठी नावीन्य आणि तंत्रज्ञान ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात महिलांनी आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनाचे तसेच आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले होते. या कार्याची दखल घेण्यासाठी यंदा लैंगिक समानतेसाठी नावीन्य आणि तंत्रज्ञान या संकल्पनेंतर्गत जागतिक महिला दिन 2023 साजरा केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे. यासाठी एवढेच म्हणेन की,
सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
PKL : लवकरच सुरू होणार महिला प्रो कबड्डी लीग