IRCTC Tour Package: उन्हाळाच्या सुट्टीमध्ये घ्या स्वर्गाचा अनुभव, लेह-लडाख च्या मनमोहक वातावरणांत जोडीदारासोबत घालवा क्वालिटी टाइम, जाणून घ्या पॅकेज बद्दल

लाइफफंडा
Updated Mar 28, 2023 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

लेह-लडाख चे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. भारतातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांमधील हे एक ठिकाण आहे, अशामध्ये IRCTC ने एक टुर पॅकेज जाहीर केले आहे, ज्यामध्ये तुम्ही लेह लडाख च्या सहलीचा मनसोक्त आनंद लुटू शकता. 

लेह -लडाख भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
लेह लडाख ‍ चादर ट्रॅक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्याच्या सुट्टीत घ्या लेह लडाख टुर चा आनंद
  • IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले टुर पॅकेज
  • पॅकेज बद्दल महत्वपूर्ण माहिती

IRCTC Tour Package: लेह -लडाख भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तिथले सौंदर्य आणि बर्फाळ दऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने इथे पर्यटक भेट देत असतात. IRCTC Package enjoy the beautiful valleys of leh-ladakh in this Summer Vacation. 

अधिक वाचा : वय 30 झालं तरी 40 व्या वर्षी व्हाल करोडपती? कसं जाणून घ्या

आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार आहे. अशावेळी जर तुम्ही कुठे जाण्याचे बेत आखत असाल तर लेह लडाख तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. इथे तुम्हाला स्वर्गात आल्यासारखे वाटेल. लेह लडाख ची सहल पर्यटकांसाठी अविस्मरणीय आणि शानदार बनवण्याकरिता आयआरसीटीसीने एक खास पॅकेज उपलब्ध करून दिले आहेत. या पॅकेजचे नाव लेह विथ टर्टुक एक्स हैद्राबाद टूर पैकेज असे आहे. 

पॅकेज बद्दल महत्वपूर्ण माहिती

4 मे 2023 पासून सुरू होणारे ही टूर 7 दिवस आणि 6 रात्र अशी असणार आहे. याची सुरुवात हैद्राबादपासून लेह आणि परत अशी असेल. यामध्ये विमान तिकीटासह बस, हॉटेल, जेवण, गाईड आणि संरक्षण विमा या सुविधांचा देखील समावेश आहे.  हे टुर पॅकेज तीन वेगवेगळ्या वर्गांमध्ये उपलब्ध आहेत.         

सिंगल, डबल आणि ट्रिपल असे हे तीन वर्ग आहेत. सिंगल क्लाससाठी प्रती व्यक्ती 54,500 रुपये असे शुल्क असून डबल वर्गासाठी प्रति व्यक्ती 48,560 रुपये शुल्क आहे. तसेच ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी प्रति व्यक्ति 47,830 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.  शिवाय 5 ते 11 वर्षाच्या आतील मुलांच्या बेडसह 45,575 रुपये आणि बेडशिवाय 41,750 रुपये शुल्क टूर पॅकेजमध्ये असेल. या टूर पॅकेजमध्ये प्रवासादरम्यान  प्रवाशांना ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर दिले जाईल.

अधिक वाचा : ​अख्ख कृषी अधिकारी कार्यालय लाचखोर; सर्व अधिकाऱ्यांना अटक

ही टूर पॅकेज बुक करण्यासाठी तुम्ही IRCTC ची वेबसाइट irctctourism.com वर जाऊ शकता किंवा IRCTC टूरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, अंचल कार्यालयात जाऊन तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सीट बूक करू शकता. 

लेह - लडाख मधील प्रमुख पर्यटन स्थळ 

  1. पॅंगोंग तलाव
  2. मॅग्नेटिक टेकडी
  3. लेह पॅलेस
  4. चादर ट्रॅक
  5. फुगतल मठ
  6. गुरुद्वारा पाथर साहिब
  7. लेह मार्केट
  8. शांती स्तूप
  9. खार्दुंग ला पास
  10. हेमिस मठ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी