Rajasthan Tour Package: देशात पर्यटनासाठी (Tourism) अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहेत. हिवाळा (Winter) हा पर्यटनासाठी सर्वात उत्तम ऋतू मानला जातो. जर तुम्ही राजस्थानला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर IRCTC च्या एका उत्तम पॅकेजचा लाभ घेऊ शकता. IRCTCनं राजस्थान साठी एक किफायतशीर टूर पॅकेज जाहीर केले आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही जयपुर, अजमेर, जोधपुर, जैसलमेर आणि बिकानेर यासारख्या अनेक शहरांमध्ये फिरू शकाल. हे पॅकेज सहा रात्री आणि सात दिवसांचे असणार आहे.
IRCTC ना जाहीर केलेल्या ह्या पॅकेजचे नाव जयपुर-अजमेर-पुष्कर-जोधपूर-जैसलमेर-बिकानेर-जयपुर असं आहे. या पॅकेजचे दर वेगवेगळे आहेत. तीन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये हे पॅकेज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यातील सर्वात कमी दराचे पॅकेज हे 15080 रुपयांचे आहे. या तुम्हाला ट्रॅव्हलरमध्ये बसून ट्रिपल शेअरिंग करावी लागेल. तर यातील सर्वात महागडा पॅकेज हे 59190 रुपयांचं आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला इंडिगो, डिझायर किंवा एटीओस यासारख्या गाड्यांचा समावेश आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही तुमची श्रेणी निवडू शकता.
या पॅकेज नुसार तुम्हाला एसी कारने रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, विमानतळे किंवा प्रेक्षणीय ठिकाणी नेलं जाईल. याच गाड्यांमधून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पिकअप आणि ड्रॉप केलं जाईल. या पॅकेज मध्ये तुम्हाला सहा ब्रेकफास्टही मिळणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक रात्री राहण्यासाठी तुम्हाला एसी हॉटेल बुक करण्यात येईल. या टूरची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता.
राजस्थान हे राज्य पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. जयपुर हे गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. राजस्थानची राजधानी आणि राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून जयपूरचा लौकिक आहे. जोधपूर हे राजस्थान मधील दुसरे सर्वात मोठे शहर. उन्हाळ्याच्या दिवसात 'सन सिटी' नावाने हे शहर ओळखले जाते. मेहरानगढ किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या निळ्या रंगाच्या घरांमुळे 'ब्लू सिटी' म्हणूनही याची ओळख आहे. तर अजमेर हे मुस्लिम धर्मियांसाठी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे.
अधिक वाचा - Online game habit: मुलांना ऑनलाईन गेमचं व्यसन लागतंय? सोडवण्यासाठी करा हे उपाय
वैयक्तिक रित्या एखाद्या राज्याची आणि त्या राज्यातील काही प्रमुख शहरांची सहल करणे हे आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतं. मात्र IRCTC सारख्या संस्था अत्यल्प दरात हे पॅकेज उपलब्ध करून देत असतात. कमी बजेट असलेल्या मात्र पर्यटनाची हौस असलेल्या अनेक नागरिकांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते.