कोरोनाच्या काळात ठेवावेत का शारीरिक संबंध? इथे जाणून घ्या सुरक्षिततेबद्दलची पूर्ण माहिती

लाइफफंडा
Updated Sep 12, 2020 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Corona virus and sex: कोरोनाच्या काळात सर्वच बाबतीत सावधानी गरजेची आहे. हीच गोष्ट शारीरिक संबंधांनाही लागू होते. कोरोनाच्या काळातील शारीरिक संबंधांबद्दल डॉक्टरांची मते जाणून घेऊया.

Is sex safe during corona pandemic? Read to know the safety precautions
कोरोनाच्या काळात ठेवावेत का शारीरिक संबंध? इथे जाणून घ्या सुरक्षिततेबद्दलची पूर्ण माहिती  |  फोटो सौजन्य: Shutterstock

थोडं पण कामाचं

  • चुंबन आणि शारीरिक जवळकीतून कोव्हिड-19 होण्याचा महत्वाचा धोका आहे
  • कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील, म्हणजेच आपण कोरोना निगेटिव्ह असेल तर संबंध ठेवण्यास हरकत नाही
  • कोरोनापासून बचावासाठी सर्व काळजी आणि सावधानी घेणे महत्वाचे आहे

नवी दिल्ली: कोरोनाचे संक्रमण (Corona infection) एका संक्रमित व्यक्तीची लाळ, नाक, तोंडातून श्वास आणि शिंकेच्या थेंबांशी संपर्कात आल्याने (spreads due to coming in contact with saliva, nose, mouth via breath and sneezes) पसरते. याचाच अर्थ चुंबन आणि शारीरिक जवळकीतूनही कोव्हिड-19 होण्याचा महत्वाचा धोका (risk of spread of Covid-19 through physical intimacy and kissing) आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कोणत्याही व्यक्तीच्या वीर्यात कोरोनाचे विषाणू आढळून आलेले (no traces of corona virus in human semen) नाहीत. याचा अर्थ असा की संभोगात सामील असलेल्या कोणत्याही द्रव पदार्थाद्वारे एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरत (fluids in sexual activities have no risk of corona transmission) नाही. कोरोना विषाणूच्या काळात शारीरिक संबंधांविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे आहेत:

प्रश्न: सध्याच्या काळात सुरक्षित शारीरिक संबंधांना मान्यता आहे का?  

उत्तर: कुणाच्याही जवळ ६ फुटांच्या अंतरावर आल्यास संसर्गाचा धोका सुरू होतो. आणि अर्थातच जर आपण शारीरिक संबंध करत असाल, तर गर्भावस्था, लैंगिक रोग, एचआयव्ही एड्स अशांसाठी ही जोखीम असतेच. आणि सुरक्षित शारीरिक संबंधांची जुनी व्याख्या अद्यापही लागू आहे.

सुरक्षित शारीरिक संबंध गरजेचे

श्वास घेणे, बोलणे, खोकणे आणि शिंकण्यातून उत्पन्न होणारे कोव्हिड-19चे विषाणू असलेले छोटे थेंब जे खूपच छोटे संक्रमण वाहक वाटतात, ते नाक आणि तोंडावर चिकटतात आणि इतरांना संक्रमित करू शकतात. जर जोडीदारांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील, जर दोघेही कोरोना निगेटिव्ह असतील तर शारीरिक संबंध ठेवण्यात काही हरकत नाही, पण जर एखाद्या व्यक्तीने कोरोनाबाधित असलेल्या एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवले तर काही आवश्यक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. शारीरिक संबंधांच्या आधी आणि नंतर लगेचच संपूर्ण शरीराची साबणाने नीट स्वच्छता केली तर संसर्गापासून बचाव केला जाऊ शकतो. कंडोमचा वापर करूनही कोरोनाची जोखीम कमी करता येऊ शकते.

मर्यादित शारीरिक संबंध अधिक चांगले

कोरोनाचा विषाणू योनीस्त्राव किंवा स्खलनात आहे की नाही याबद्दल माहिती उपलब्ध नसली तरी तो मानवी मलामध्ये आढळून आला आहे. त्यामुळे या काळात शारीरिक संबंध सीमित ठेवणे अधिक चांगले आहे, जेणेकरून हातांची स्वच्छता आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करता येईल. जर आपल्या जोडीदारामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत किंवा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे तर शारीरिक संबंध न ठेवणेच सर्वात चांगले आहे.

शक्य असल्यास वेगवेगळ्या खोलीत झोपा

जर शक्य असेल तर या काळात वेगवेगळ्या खोलीत झोपा. कोरोनाबाधित व्यक्तीसाठी एक खोली निश्चित करा. ६ फुटांचे अंतर राखण्याचा प्रयत्न करा आणि किटाणूनाशकाने पुन्हापुन्हा पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण करा. संक्रमित व्यक्तीला १४ दिवस आपल्या घरापासून शक्यतो अलग ठेवा.

(लेखक डॉक्टर कुलदीप अग्रवाल हे कोशांबीच्या यशोदा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यूरोलॉजी आणि एंड्रोलॉजी विभागात सल्लागार आहेत.)

(डिस्क्लेमर: प्रस्तुत लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक आहेत आणि टाईम्स नेटवर्क या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी