Real or Fake: साखर खाण्याऐवजी गूळ खा. गूळ आरोग्यासाठी लाभदायी असतो असे अनेकजण सांगतात. डाएट करणारी मंडळी गूळ खाण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत. गुळाचे महत्त्व वाढत आहे. दुसरीकडे बाजारात भेसळयुक्त गूळ चढ्या दराने विकणाऱ्यांचे प्रमाण पण वाढत आहे. भेसळयुक्त गूळ खाणे आरोग्यासाठी हानीकारक आहे पण शुद्ध गूळ खाणे आरोग्यासाठी लाभदायी आहे. यामुळे आपण खरेदी करत असलेला गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे तपासून बघणे महत्त्वाचे आहे.
रंगावरून तुम्ही गुळाची पारख करू शकता. गडद तपकिरी किंवा तपकिरी रंगाचा गूळ खरा असतो. तर, पिवळा किंवा हलका तपकिरी रंग असलेला गूळ भेसळयुक्त किंवा बनावट असू शकतो.
थोडासा चाखून गुळ शुद्ध की भेसळयुक्त हे ओळखता येऊ शकते. जर गुळाची चव गोड लागली तर तो गुळ चांगल्या दर्जाचा आहे. बनावट गुळ चवीला खारट किंवा कडू असतो.
दुसरी पध्दत अशी की तुम्ही पाण्यात टाकूनही बघू शकता. जर पाण्यात गूळ पूर्णपणे विरघळला तर तो चांगला गूळ आहे. आणि जर गूळ पाण्यात खाली बसला तर तो बनावट पध्दतीचा आहे. अशाप्रकारे तुम्ही गुळाची गुणवत्ता तपासू शकता.