Ghee Purity Check Tricks: भारतातील अनेकांच्या घरात गावरान तूप खाल्लं जातं. जेवणात गावरान तूपचा वापर केला जातो. आरोग्यासाठी हे तूप फायदेशीर असल्याने डॉक्टर आपल्याला आहारात तूपचा समावेश करण्यास सांगतात. डॉक्टरांचा सल्ला ऐकून अनेकजण बाजारातील गावरान तूप (Gavran ghee) आणतात परंतु तुम्ही जे तूप खात आहात ते बनावट किंवा भेसळ युक्त तर नाही ना? याबाबत मात्र सत्यता न पडताळता आपण ते तूप आहारात समाविष्ट करत असतो. (Is there no artificial ghee in your food? identified Fake ghee by these four methods)
अधिक वाचा : जाणून घ्या कसा असेल 14 जानेवारी 2023 चा दिवस
प्रत्यक्षात डेअरी उत्पादकांकडून विकल्या जाणाऱ्या तुपासह नामांकित ब्रँडच्या तुपात भेसळ होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत खरे आणि भेसळयुक्त तूप कसे ओळखायचे, हे कळत नाही. खरं आहे ना, आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त तूप ओळखण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत.
अधिक वाचा : घरी शुद्ध तूप तयार करण्यासाठी TIPS
तुपाचा खरेखोटेपणा तपासण्याचे सोपे तंत्र
तूप खरे आहे की भेसळ आहे हे जाणून घ्यायचे असल्यास (Ghee Purity Check Tips),तर एक चमचा तूप एका ग्लास पाण्यात विरघळवून घ्या. जर ते तूप पाण्याच्या वर तरंगू लागले तर ते खरे आहे, असे समजावे. जर तूप तरंगण्याऐवजी ते तूप पाण्याच्या खाली साठू लागले तर त्यात भेसळ झाली आहे असं समजावं.
अधिक वाचा : Cholesterol, High BP कंट्रोल करा, टाळा Heart Attack चा धोका
तुम्ही तुमच्या तळहातावर घासूनही तुपाची वास्तविकता जाणून घेऊ शकता. यासाठी थोडे तूप घेऊन तळहातावर चोळा. जर ते तूप चोळल्यानंतर वितळू लागले तर तुमचे तूप अगदी शुद्ध आहे असे समजू शकता.दुसरीकडे ते तूप वितळण्याऐवजी तळहातावर राहिले तर त्यात भेसळ झाली असल्याचं समाजावं.
मीठाने ही तुम्ही गावरान तुपाची पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्ही एका भांड्यात एक चमचा तूप ठेवा आणि नंतर त्यात थोडे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि 2 चिमूटभर मीठ घाला. यानंतर तिन्ही मिक्स करा आणि सुमारे 25 मिनिटे ते मिश्रण असेच राहू द्या. जर तुमच्या तुपाचा रंग बदलू लागला तर याचा अर्थ त्यात भेसळ झाली आहे आणि रंग बदलला नाही तर ते शुद्ध तूप असल्याचं समजावे.
अधिक वाचा : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पुण्यातील घटनेने खळबळ
तूप गरम करून त्याची शुद्धता तपासता येते. यासाठी यासाठी एक चमचा तूप घेऊन गरम करा. जर ते लगेच वितळले आणि तपकिरी झाले तर ते शुद्ध तूप आहे. याउलट तूप उशिरा वितळले आणि त्यात पिवळा रंग येऊ लागला तर समजून घ्या की त्यात भेसळ झाली आहे.
गावरान तूपाचं सेवन करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर मानले जाते. गावरान तूप खाल्ल्यानं व्यक्तीला अनेक आजारांवर मात करता येते. परंतु शरीराचं आरोग्य राखण्यासाठी व्यक्तीनं गावरान आणि देशी तूपाचं सेवन करायला हवं.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक चमचाभर देशी तूपाचं सेवन केल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या चेहऱ्यावर होतो. तुपाच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो. गावरान तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही, तसेच तुपाचे अनेक फायदे असल्याने तूप खावे मात्र ते किती खावे यासाठी एक निश्चित मात्रा असावी. नियमित तूपाचं सेवन केल्यास व्यक्तीची हाडं मजबूत होतात व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.