Love or only Physical Relationship : तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खरंच प्रेम आहे की केवळ शारिरीक आकर्षण? अशा प्रकारे घ्या जाणून

Real love or Physical Need :  तुमचा जोडीदार तुमच्यावर खरचं मनापासून प्रेम करतो की फक्त तुमच्यासोबत शारिरीक संबंधांसाठी तुमच्यासोबत आहे हे जाणून घेणे तसे अवघड आहे. आपल्या जोडीदाराचा स्वभाव आणि त्याच्या वागणुकीवरून तुम्हाला अंदाज बांधता येईल. आजकाल प्रेमात धोका मिळणे, फसवणूक होणे ही सामान्य बाब आहे. अशा वेळी तुमचा जोडीदार तुमच्याबाबत किती सिरियस आहे हे जआणून घेणे गरजेचे आहे.

love or just physical need
प्रेम की फक्त शारिरीक गरज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुमचा जोडीदार तुमच्यावर खरचं मनापासून प्रेम करतो की फक्त तुमच्यासोबत शारिरीक संबंधांसाठी तुमच्यासोबत आहे हे जाणून घेणे तसे अवघड आहे.
  • आपल्या जोडीदाराचा स्वभाव आणि त्याच्या वागणुकीवरून तुम्हाला अंदाज बांधता येईल
  • आजकाल प्रेमात धोका मिळणे, फसवणूक होणे ही सामान्य बाब आहे.

Real love or Physical Need :  तुमचा जोडीदार तुमच्यावर खरचं मनापासून प्रेम करतो की फक्त तुमच्यासोबत शारिरीक संबंधांसाठी तुमच्यासोबत आहे हे जाणून घेणे तसे अवघड आहे. आपल्या जोडीदाराचा स्वभाव आणि त्याच्या वागणुकीवरून तुम्हाला अंदाज बांधता येईल. आजकाल प्रेमात धोका मिळणे, फसवणूक होणे ही सामान्य बाब आहे. अशा वेळी तुमचा जोडीदार तुमच्याबाबत किती सिरियस आहे हे जआणून घेणे गरजेचे आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर खरंच प्रेम करतो की फक्त मजा मस्ती करण्यासाठी किंवा शारिरीक गरज पूर्ण करण्यासाठी तुमच्यासोबत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  (is your partner really loved you or just want physical need read love tips in marathi)

अधिक वाचा : Safety tips for matrimonial sites: मॅट्रिमोनिअल साईट्सवर जोडीदार शोधताना होऊ शकते फसगत, लक्षात ठेवा ‘या’ सेफ्टी टिप्स


फक्त शारिरीक संबंधांवर होते चर्चा  ?

जर तुमचा जोडीदार फक्त शारिरीक संबंधांबद्दलच बोलतो का? तुमचा जोडीदार तुमच्या भविष्याबद्दल चर्चा करतो का? तुमचा जोडीदार फक्त एकट्यात भेटण्यासाथी सतत आग्रही असतो का? तसेच तुमचा जोडीदार तुमची काळजी घेतो का आणि तितका रोमँटिक असतो का? या गोष्टीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचा पार्टनर तुमच्यावर खरच प्रेम करतो की फक्त शारिरीक संबंधांसाठी तुमच्यासोबत आहे.

अधिक वाचा :  Optical Illusion: शोधून-शोधून मुलगा थकला तरीही सापडला नाही बूट, पाहा तुम्हाला दिसतोय का?

लग्नासाठी टाळाटाळ

तुमचा जोडीदार लग्नाबाबत किती गंभीर आहे याबद्दल एकदा तपासून बघा. जर तुमचा जोडीदार लग्नाबद्दल चर्चा करत नसेल किंवा लग्नाचा विषय आल्यावर तो टाळाटाळ करत असेल तर त्याचा एक अर्थ तो तुमच्या बाबतीत तितकासा गंभीर नाही. जर तुमच्या जोडीदाराला भविष्याची चिंता नसेल आणि तुमची खास काळजी नसेल तर याचा अर्थ तुमचा जोडीदार तुमचा गैरफायदही घेत असेल. 

अधिक वाचा :  Women safety tips: नव्या शहरात शिफ्ट होताय? अगोदर वाचा या सेफ्टी टिप्स


कुटुंबीयांची भेट

जर तुमचा जोडीदार त्यांच्या कुटुंबीयांची आणि तुमची भेट घालून देत नसेल तर याचा अर्थ काहीतरी चुकीचे आहे. जर तुमचा जोडीदार रीलेशनशिपबाबत गंभीर असेल तर तो तुमची आणि त्याच्या पालकांची भेट घालून देईल आणि पुढील भविष्याचा विचार करेल. 

अधिक वाचा :  Hidden Camera in oyo : ओयो रूम किंवा लॉजच्या रूममध्ये कॅमेरा लपवून तर नाही ना ठेवला? अशा प्रकारे घ्या शोध

फक्त शारिरीक गरज

अनेक जण सुरूवातीला गोड गोड बोलून आपण या रीलेशनशिपबद्दल किती गंभीर आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जस जसा वेळ जातो तेव्हा आपला जोडीदार फक्त शारिरीक संबंधांसाठीच उत्सुक असल्याचे समोर येतं. तेव्हा काहींना खूप पश्चाताप होतो. अशा वेळी आपला पार्टर्नर किती सिरीयस आहे, रिलेशनशिप आणि करीअरबद्दल आपला जोडीदार किती गंभीर आहे, आपले नाते किती टिकेल आणि किती यशस्वी होईल यावर जर तुमचा जोडीदार चर्चा करत असेल तर ते खरं प्रेम आहे असे समजावे. 

अधिक वाचा : Typing on laptop: लॅपटॉपवर काम करून थकतात हात आणि बोटं, असं करा रिलॅक्स

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी