Chanakya Niti : चाणक्य निती : कोणत्या ५ परिस्थितींपासून अंतर राखणे हिताचे

it is wise to keep distance from some situations know 5 things of acharya chanakya : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमधून (Chanakya Niti) केलेले मार्गदर्शन कालातीत आणि आजच्या काळाला अनुरुप असे आहे. जाणून घेऊ चाणक्य नितीमधील महत्त्वाच्या बाबी.

it is wise to keep distance from some situations know 5 things of acharya chanakya
Chanakya Niti : चाणक्य निती : कोणत्या ५ परिस्थितींपासून अंतर राखणे हिताचे 
थोडं पण कामाचं
  • चाणक्य निती : कोणत्या ५ परिस्थितींपासून अंतर राखणे हिताचे
  • चाणक्य नितीमध्ये आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन
  • चाणक्य नितीमध्ये सज्जन पुरुषाची लक्षणे

it is wise to keep distance from some situations know 5 things of acharya chanakya : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकीय तज्ज्ञ, चतुर कुटनीती तज्ज्ञ, प्रकांड अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या कुशाग्र बुद्धी आणि अतुलनीय तर्कशास्त्राचा प्रभाव सर्वांवर पडत होता. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) या नावाने ओळखण्यास सुरुवात झाली. त्यांनी निती शास्त्रात त्यांच्या ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. सज्जन पुरुषाची लक्षणे सांगितली. प्रलयासारख्या बिकट परिस्थितीतही जे बदलत नाहीत आणि त्यांच्या मर्यादांचे भान राखून वर्तन करतात ते सज्जन, असे आचार्य चाणक्य म्हणायचे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमधून (Chanakya Niti) केलेले मार्गदर्शन कालातीत आणि आजच्या काळाला अनुरुप असे आहे. जाणून घेऊ चाणक्य नितीमधील महत्त्वाच्या बाबी.

1. चाणक्य नितीनुसार भयानक आपत्ती, परकियांचा हल्ला, ओला किंवा सुका दुष्काळ अथवा दुष्टांची साथ मिळणे यापैकी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास पलायन हाच स्वतःच्या सुरक्षेचा उत्तम मार्ग आहे. 

2. चाणक्य नितीनुसार प्रलय आला की, समुद्र पण त्याची मर्यादा भंग करत उंचच उंच लाटांनिशी जमिनीवर धडकतो. किनाऱ्याजवळच्या परिसराची नासधूस करतो. पण या बिकट परिस्थितीतही जे बदलत नाहीत आणि त्यांच्या मर्यादांचे भान राखून वर्तन करतात ते सज्जन.

3. चाणक्य नितीनुसार सुंदर, संपन्न अशा चांगल्या कुटुंबात जन्मूनही ज्याच्याकडे ज्ञान नाही तो गंधहीन अशा सुंदर फुलासारखा आहे.

4. चाणक्य नितीनुसार पहिल्या पाच वर्षांपर्यंत मुलाचे लाड करावे. नंतरच्या दहा वर्षात मुलाला धाकात ठेवावे. मुलाने सोळाव्या वर्षात पदार्पण केल्यापासून त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागावे.

5. चाणक्य नितीनुसार जसे पूर्ण जंगल एका सुगंधीत फुलांनी डवरलेल्या झाडाने मोहून जाते तसेच एक गुणवान मुलगा संपूर्ण कुळाचे नाव मोठे करतो. तसेच एक सुकलेले आणि जळत असलेले झाड संपूर्ण वन नष्ट करू शकते. याच पद्धतीने एक बिघडलेला मुलगा (कुपुत्र) संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी