Tasteless Candy: आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्या ज्या गोष्टी खातो, त्याला कुठली ना कुठली चव (Taste) असते. चपाती, भाजी, वरण, भात, आमटी, भजी, तूप, दही,दूध, तळण यासारखे अनेक पदार्थ आपण खातो. यातील प्रत्येक पदार्थाची चव ठरलेली असते. तो पदार्थ डोळे झाकून खाल्ला तरी चवीवरून आपण त्या पदार्थाचे नाव ओळखू शकतो. मात्र आतापर्यंत ज्या पदार्थाची चवच ओळखता येणार नाही, असा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला आहे का? जपानच्या एका कंपनीने (Company in Japan) अशी एक ट़ॉफी तयार केली आहे. या टॉफीला कुठलीही चव नाही. ही टॉफी ना गोड आहे, ना तिखट आहे, ना खारट आहे, ना तुरट आहे. कुठलीही चव नसलेल्या या टॉफीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे.
जपानच्या लॉसन नावाच्या कंपनीने हे अनोखं उत्पादन बाजारात आणलं आहे. या कंपनीचं बेचव गोळीचं हे उत्पादन सध्या जगभर चर्चेचा विषय बनलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही एक कुठलीही चव नसलेली कँडी आहे. याचा अर्थ जेव्हा तुम्ही ही कँडी खाल, तेव्हा तुम्हाला त्याची कुठलीही चव लागणार नाही. ना ती गोड असेल, ना तिखट, ना कडू, ना तुरट, ना आंबट. ती असेल टेस्टलेस.
अधिक वाचा - Parenting Tips: या 5 गोष्टींचा मुलांवर होतो विपरित परिणाम...टाळा या चुका
सिंथेटिक शुगरचा पर्याय असणारा polydextrose हा घटक यात वापऱण्यात आला आहे. त्याशिवाय ऑरगॅनिक शुगरचा पर्याय erythritol याचाही यात वापर करण्यात आला आहे. ही गोळी खरोखरच बेचव आहे का, याची खातरजमा काही वृत्तसंस्थांनी केली. काही प्रतिनिधींनी ही कँडी चाखून पाहिली असता, ती खरोखरच बेचव असल्याचा अनुभव त्यांना आला. तर काहीजणांना त्यात हलक्या गोड चवीचाही अनुभव आला.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही कँडी पूर्णतः बेचव आहे. मात्र काहीजणांना त्यात स्पोर्ट्स ड्रिंकशी मिळत्याजुळत्या चवीचा भास झाला आहे. तर काहीजणांना त्यात हलकी गोड चव असल्याचा अनुभव आला आहे. प्रश्न हा आहे की कंपनीने अशी कुठलीही चव नसलेली गोळी कशासाठी तयार केली? त्याचं उत्तर कंपनीने नुकतंच दिलं आहे. ही गोळी तयार करण्यापूर्वी मार्केटचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांचा आधार घेऊन या कँडिची संकल्पना सुचल्याचं सांगितलं जात आहे.
अधिक वाचा - Vastu Tips: वास्तुशी संबंधित' हे' 5 उपाय केल्यास घरात येते समृद्धी, आर्थिक समस्या दूर होतात
जगभरातील अनेकांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. त्यासाठी त्यांना सतत काही ना काही चघळत राहावेसे वाटते. मात्र बाजारात मिळणाऱ्या कँडीत मोठ्या प्रमाणात साखर असते आणि रंगही असतात. त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. अशा नागरिकांना ही गोळी चघळत राहिल्यामुळे तोंड कोरडे पडणार नाही. त्याचप्रमाणे ही बेचव गोळी असल्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीजही जाणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे.