Jaya Kishori Motivationa and love quotes: प्रसिद्ध कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या लग्नाच्या संदर्भात अनेक अफवा उडाल्या होत्या. जया किशोरी आणि धीरेंद्र शास्त्री यांचा विवाह होणार की नाही यावरुन सुद्धा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नंतर दोघांनीही या वृत्ताचं खंडन केलं होतं. कथावाचक जया किशोरी या भगवान श्री कृष्णाच्या भक्त आहेत. जया किशोरी यांनी भगवान कृष्णाचे प्रेम हे मनापासून ओळखले आहे. जाणून घेऊयात जया किशोरी यांनी सांगितलेल्या काही खास गोष्टी...
हे पण वाचा : तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान
कथावाचक जया किशोरी सांगतात की, "प्रेम तुम्हाला बनवू शकते आणि नष्ट ही करू शकते. तुम्ही प्रेम कशा प्रकारे स्वीकारता यावर सर्वकाही अवलंबून आहे. अशा शिक्षणाचा काय उपयोग जे तुमच्याकडून तुमचा साधेपणा हिसकावून घेतो."
मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांच्या मते, "एक कप फोडण्यासाठी एक सेकंद खूप आहे मात्र, तोच कप तयार करण्यासाठी अनेक तास लागतात. त्याचप्रमाणे माणसाला दुखवणे सोपं असतं पण त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांच्या जखमा भरुन काढण्यासाठी बराच वेळ लागतो."
हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे
जया किशोरी सांगतात, "दुसऱ्याला तुमच्या मनात, ह्रदयात जागा देण्यापूर्वी स्वत:साठी सुद्धा थोडी जागा ठेवायला हवी. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही जगण्याचा निश्चय करा. तुम्हाला हे जमणार नाही हे मनातून काढून टाका आणि कामाला सुरुवात करा."
जया किशोरी यांच्या मते, "प्रत्येक नात्यात विश्वास आवश्यक असतो. आयुष्याचे दुसरे नाव परिवर्तन आहे. मग ते परिवर्तन तुमच्यात असो, तुमच्या नात्यात असो, तुमच्या कामात असो किंवा जगात असो. हे परिवर्तन, बदल स्वीकारायला शिका."
जया किशोरी यांच्यानुसार, "तुम्ही जे गमावले आहे ते विसरा. तुम्हाला जे मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी काम करत रहा."