Today in History  : Thursday, 4th August 2022 : आज आहे सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा जन्मदिन तर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा स्मृतीदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष 

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • किशोर कुमार यांची जयंती.
 • सदाशिवराव भाऊ यांचे पानिपताच्या युद्धात निधन.
 • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची पुण्यतिथी.

Today in History: Thursday, 4th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. (kishore kumar birth anniversary know more today in hisotory marathi dinvishesh 4th august 2022) 

अधिक वाचा :  Clothing hacks : पावसात कपडे सुकवण्यासाठी तसेच दुर्गंध घालवण्यासाठी या आहेत टिप्स


४ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २०२०: बेरूत, लेबनॉन स्फोट - येथे झालेल्या भीषण विस्फोटामध्ये किमान २२० लोकांचे निधन तर तर ३ लाख पेक्षा जास्तलोक बेघर.
 2. २००७: फिनिक्स - हे नासाचे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
 3. २००१: भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
 4. १९९८: कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो - फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा, यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
 5. १९९३: राजेन्द्र खंडेलवाल - यांनी अपंग असून सुद्धा समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुट उंचीवर असलेली खारदुंग ला ही खिंड कायनेटिक होंडा स्कूटरवर पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.
 6. १९८४: अपर व्होल्टा / बुर्किना फासो - अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.
 7. १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र, तुर्भे - येथे सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
 8. १९४७: सर्वोच्च न्यायालय, जपान - स्थापना झाली.
 9. १९२४: सोविएत युनियन व मेक्सिको देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
 10. १९१५: पहिले महायुद्ध - १९१५ ची ग्रेट रिट्रीट: जर्मन सैन्याने वॉर्सावर कब्जा केला.
 11. १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
 12. १८५४: जपान - देशाच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.
 13. १७९६: फ्रेंच क्रांतिकारक युद्ध - लोनाटोची लढाई: नेपोलियनने इटलीच्या फ्रेंच सैन्याला विजय मिळवून दिला.
 14. १७८३: माउंट असामा, जपान ज्वालामुखी - येथे झालेल्या उद्रेकामुळे किमान १४०० लोकांचे निधन.

अधिक वाचा :  August Holidays: ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांचा पाऊस; 'या' ठिकाणी फिरण्याचं करू शकता प्लॅनिंग

४ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९६१: बराक ओबामा - अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार
 2. १९५०: एन. रंगास्वामी - भारतीय वकील आणि राजकारणी
 3. १९३९: अमीन फहीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी (निधन: २१ नोव्हेंबर २०१५)
 4. १९३१: शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (निधन: ४ ऑगस्ट २०२०)
 5. १९३१: नरेन ताम्हाणे - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १९ मार्च २००२)
 6. १९२९: किशोर कुमार - सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार आणि आभिनेते (निधन: १३ ऑक्टोबर १९८७)
 7. १८९४: नारायण फडके - साहित्यिक व वक्ते (निधन: २२ ऑक्टोबर १९७८)
 8. १८८८: ताहेर सैफुद्दीन - भारतीय धर्मगुरू (निधन: १२ नोव्हेंबर १९६५)
 9. १८६३: वासुदेवशास्त्री अभ्यंकर - पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय
 10. १८४५: सर फिरोजशहा मेहता - कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते (निधन: ५ नोव्हेंबर १९१५)
 11. १८३४: जॉन वेन - ब्रिटिश गणितज्ञ (निधन: ४ एप्रिल १९२३)
 12. १८२१: लुई वूत्तोन - फॅशन कंपनी लुई वूत्तोनचे डिझायनर (निधन: २७ फेब्रुवारी १८९२)
 13. १७३०: सदाशिवराव भाऊ - पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती (निधन: १४ जानेवारी १७६१)

अधिक वाचा : Chanaka Niti: या 4 गोष्टींनंतर अंघोळ करायला विसरू नका, नाहीतर भोगावे लागू शकतात वाईट परिणाम

४ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २२१: लेडी जेन - चीनी सम्राज्ञी (जन्म: २६ जानेवारी १८३)
 2. २०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
 3. २००६: नंदिनी सत्पथी - भारतीय लेखक व राजकारणी (जन्म: ९ जून १९३१)
 4. २००३: फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स - अमेरिकन बालरोगतज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १९१६)
 5. १९९७: जीन काल्मेंट - १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेल्या फ्रेन्च महिला (जन्म: २१ फेब्रुवारी १८७५)
 6. १९७७: एडगर एड्रियन - इंग्रजी फिजिओलॉजिस्ट - नोबेल पुरस्कार (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)
 7. १९३७: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल - प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)
 8. १०६०: हेन्री - फ्रान्सचा राजा (जन्म: ४ मे १००८)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी