नवी दिल्ली: Kitchen Hacks: महिलांच्या किचनमधला सर्वांत चिंतेचा विषय म्हणजे भांडी स्वच्छ करणं. ज्या ज्या भांड्यात जेवण बनवलं जातं. त्यानंतर ती भांडी स्वच्छ करणं हा एक टास्क नेहमी महिलांसमोर असतो. अनेकदा असं होतं की चहा बनवताना किंवा दूध उकळताना भांडी जळतात. कुकर किंवा कढई जेवण बनवल्यानंतर ते भांडं जळते. मात्र ते थोडंफार सामान्य आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भांडी स्वच्छ करणं खूप कठिण असते. जळलेली भांडी साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही वेळा ती साफही होत नाहीत. पण तुम्हाला हवे असल्यास काही सोप्या उपायांनी तुम्ही जळलेली भांडी साफ करू शकता. आज आम्ही तुम्हाला या सोप्या उपायांबद्दल सांगणार आहोत.
जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी हे उपाय करा
बेकिंग सोडा
जळालेली भांडी बेकिंग सोड्यानं खूप लवकर साफ करता येतात. त्यामुळे जर तुमची बरीच भांडी जळाली असतील तर त्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा एका वाटीत पाण्यात विरघळवून घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस घाला. आता त्याचे मिश्रण तयार करा आणि स्टीलच्या स्क्रबरने भांडे स्वच्छ करा. तुमचे जळलेले भांडे पूर्णपणे स्वच्छ होऊन जाईल.
अधिक वाचा- फराह खानला लग्नाच्या पहिल्याच वर्षी जायचं होतं पळून; स्वतः हून केला खुलासा
लिंबाचा रस
लिंबूमध्ये एसिडीक गुणधर्म आहे. त्यात असलेल्या एसिडीकमुळे कोणत्याही प्रकारचे डाग आणि जळलेली भांडी साफ करणं शक्य होतं. जळलेले भांडे स्वच्छ करण्यासाठी लिंबू घ्या आणि ते जळलेल्या भागावर घासून घ्या, नंतर त्यात एक कप कोमट पाणी घाला. आता काही वेळानं ब्रशनं स्वच्छ करा, त्यामुळे जळलेली भांडी अगदी सहज स्वच्छ होतील.
अधिक वाचा- जुलैमध्ये पार्टनरसोबत फिरण्यासाठी 'या' आहेत Best जागा
टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रस जळालेली भांडी साफ करण्यासाठी देखील खूप प्रभावी ठरतो. यासाठी एका जळालेल्या भांड्यात टोमॅटोचा रस टाका, नंतर त्यात थोडे पाणी घालून गरम करा. आता ते चोळून घ्या. त्यानंतर तुम्ही बघाल की भांडी खूप लवकर स्वच्छ होतील, तसेच पूर्वीपेक्षा जास्त चमकतील.
(अस्वीकरण: या लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)