International Yoga Day 2019: योगा करताना जाणून घ्या पद्धत आणि नियम, नाहीतर होऊ शकतं नुकसान

लाइफफंडा
Updated Jun 15, 2019 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात प्राचीन काळापासून योगसाधनेला महत्त्व दिलं गेलंय. आता संपूर्ण जगामध्ये फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वांना योगा करण्यासाठी जागृत केलं जातंय. मात्र योगा योग्य पद्धतीनं न केल्यास त्याचं नुकसान होऊ शकतं.

Yoga
योगासनांची योग्य पद्धत आणि नियम  |  फोटो सौजन्य: BCCL

International Yoga Day 2019: २१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ म्हणून संपूर्ण जगानं मान्य केलाय. योगा आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र सर्वांना योगा करण्याची योग्य पद्धत माहिती असेल असं नाही. पण योगा जर योग्य पद्धतीनं केला नाही तर त्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं. म्हणून या आर्टिकलमध्ये आपण जाणून घ्या योगा करतांना श्वासाचं काय महत्त्व आहे आणि कोणते नियम योग करताना पाळावेत. 

योगा नेहमी योग्य पद्धतीनं करावा, जेणेकरून त्याचा फायदा होईल. योग इच्छा नसताना जबरदस्तीनं करू नये. योगा करताना मन शांत आणि आनंदी असावं. जितक्या शांतपणे आरामात आपण योगा करू, तेवढाच चांगला फायदा मिळेल. योगा करताना अनेक जण काही चुका करतात. जाणून घ्या या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळाव्यात. 

योगा करताना योग्य ताळमेळ राखणं

योग करताना अनेक जण योगासनात ताळमेळ राखत नाहीत. अनेकजण हे कधी कमी वेळ तर कधी जास्त वेळ योगासन करतात. एव्हढंच नव्हे तर अनेक जण खूप दिवस सतत योग करतात आणि कधी काही दिवसांच्या अंतरानं करतात. मात्र असं करू नये त्यामुळं शरीरावर सकारात्मक नाही तर योगासनांचा नकारात्मक परिणाम होतो. शरीर थकतं, त्रास होता, अकडल्यासारखं वाटतं.

आसन करताना जबरदस्ती

कुठलंही योगासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नये, कारण असं केल्यानं आपल्या शरीरातील मसल्स आणि नसांवर अधिकचा ताण पडतो आणि हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. योगासन करताना जितकं सहज शक्य असेल तेवढाच ताण आपल्या शरीराला द्यावा आणि तितकंच वाकावं जेव्हढं शक्य असेल. तसंच एकाच दिवशी जास्त योग केल्यानं आपण अंथरूण धरू शकता. म्हणून योगासन नेहमी शांतपणे आणि हळूहळू करावेत. 

योगासन करताना श्वासोच्छवासाची योग्य पद्धत

योगासनात श्वासोच्छवास योग्य पद्धतीनं करणं आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करणं खूप गरजेचं असतं. नाहीतर योगाचा कोणताही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ: योगासन करताना समोर वाकताना श्वास बाहेर टाकावा आणि मागच्या बाजूला वाकताना श्वास आत घ्यावा. श्वासावर लक्ष केंद्रीत करणं ही पण एक कला आहे, जी हळूहळू आपल्याला आत्मसात करता येते. योग करताना ५ किंवा १० मिनीटं श्वासावर केंद्रीत करणं खूप गरजेचं आहे. नंतर आपण ही वेळ वाढवू शकतो. जर आपण सतत श्वास घेतला नाही तर आपल्या शरीरातील सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचणार नाही, जे की आपल्या शरीरासाठी योग्य नाही. 

खाणं-पिणं योग यांच्यातील अंतर

जेवण आणि योगासन करण्यात कमीतकमी ३ तासांचं अंतर असणं खूप आवश्यक आहे. त्यासोबतच अनेक जण योगासन करताना मध्ये-मध्ये पाणी पितात. तसं अजिबात करू नये. योगासन केल्यानंतर कमीतकमी १ तासानंतर पाणी प्यावं. तसंच योगा करण्याच्या १ तासापूर्वी पाणी पिणं सोडून द्यावं. योगा करणं जितकं आवश्यक आहे, तेव्हढंच किंवा त्याहूनही अधिक ते योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. म्हणून योगासन नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत. 


टीप: वरील लेखामध्ये दिलेल्या टिप्स आणि सल्ला हा आपल्या माहितीसाठी आहे. मात्र याचा वापर करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
International Yoga Day 2019: योगा करताना जाणून घ्या पद्धत आणि नियम, नाहीतर होऊ शकतं नुकसान Description: भारतात प्राचीन काळापासून योगसाधनेला महत्त्व दिलं गेलंय. आता संपूर्ण जगामध्ये फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वांना योगा करण्यासाठी जागृत केलं जातंय. मात्र योगा योग्य पद्धतीनं न केल्यास त्याचं नुकसान होऊ शकतं.
Loading...
Loading...
Loading...