Mahatma Gandhi Jayanti: गांधी जयंतीनिमित्त असे करा भाषण, जाणून घ्या ideas

लाइफफंडा
Updated Oct 01, 2020 | 14:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mahatma Gandhi Jayanti 2020: या वर्षी महात्मा गांधी यांची १५१वी जयंती आहे. या निमित्ताने तुम्हाला भाषण द्यायचे असेल तर तुम्ही काही चांगले विषय निवडू शकता. 

mahatma gandhi
गांधी जयंतीनिमित्त असे करा भाषण, जाणून घ्या ideas 

थोडं पण कामाचं

  • १५१ वर्षांपूर्वी २ ऑक्टोबर १८६९ला गुजरातच्या पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला होता.
  • या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१वी जयंती आहे
  • दरवर्षी २ ऑक्टोबरला भारतात सगळीकडेच तसेच जगातही अनेक ठिकाणी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते.

मुंबई: दरवर्षी २ ऑक्टोबरला संपूर्ण देशात महात्मा गांधी जयंती(Mahatma Gandhi Jayanti 2020) साजरी केली जाते. तर संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस((International Day of Non Violence) म्हणून साजरा केला जातो. कारण १५१ वर्षांपूर्वी २ ऑक्टोबर १८६९ला गुजरातच्या पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला होता. संपूर्ण जग त्यांना महात्मा गांधी(Mahatma Gandhi) आणि भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखतात. दरवर्षी २ ऑक्टोबरला भारतात सगळीकडेच तसेच जगातही अनेक ठिकाणी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी रॅली, पोस्टर स्पर्ध, भाषणे, वादविवाद स्पर्धा, नाटकसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१वी जयंती आहे. तुम्हाला या निमित्ताने भाषण द्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही आयडियाज सांगत आहोत. 

गांधी जयंतीनिमित्त या विषयांवर करू शकता भाषण

१९०६-०७मध्ये महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाने आंदोलनाची सुरूवात केली होती. हे आंदोलन दक्षिण आफ्रिकेत भारतीयांच्या हक्कासाठीचे होते. 

हरिजन आणि गांधी

ज्या समाजातील लोकांना स्पर्श करणे विटाळ मानले जाते त्यांना बापूंनी हरिजन हे नाव दिले. याचा अर्थ आहे हरि(देव)ची मुले. गांधीजींच्या या पावलामुळे या लोकंना सन्मानजनक जीवनशैली देण्यात मोठी भूमिका बजावली. 

अंहिसेची भूमिका

अंहिसा - जेव्हा कधी अहिंसेबद्दल बोलले जाते तेव्हा महात्मा गांधींचे सर्वात आधी नाव समोर येते. महात्मा गाँधी यांनी केवळ भारत नव्हे तर संपूर्ण जगाला अंहिसेचे महत्त्व समजावले. 

बापू आणि भारत छोडो आंदोलन

महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ला इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलनाची(Quit India Movement) सुरूवात केली होती. तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू होते. या आंदोलनादरम्यान बापूंनी 'करो वा मरो' (Do or Die) असा नारा दिला होता. 

२ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस

महात्मा गांधी जयंतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस जगभरात अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. १५ जून २००७मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंबलीने या दिवसाला राष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित केला. 

मोहनदास करमचंद गांधी ते राष्ट्रपिता पर्यंतचा प्रवास

जी व्यक्ती बॅरिस्टर बनून वकिलीचा सराव करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेली असताना तेथे ते मोहनदास करमचंद गांधी होते. मात्र त्यांची विचारसरणी आणि लोकांच्या हक्कासाठी लढा देण्याच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना राष्ट्रपिता तसेच महात्मा ही उपाधी दिली.

भाषण कसे द्यावे

भाषणामध्ये कोणते मुद्दे असावेत हे महत्त्वाचे आहे. मात्र त्यापेक्षाही गरजेचे आहे ती म्हणजे पद्धत. यासाठी भाषण देण्याच्या एक दिवस आधी आरशासमोर उभे राहत आपल्या भाषणाचा सराव करा. तसेच कागदावर बघून भाषण म्हणावे लागणार नाही यासाठी सराव करा. लोकांच्या डोळ्यात बघत संपूर्ण आत्मविश्वासाने योग्य आवाजासहित म्हणा. तसेच कोणत्या वाक्यानंतर थांबावे यावरही लक्ष द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी