Personality Traits: कोणत्या महिन्यात झाला जन्म, कसे असेल तुमचे भविष्य, काय आहे जन्म महिना आणि पर्सनॅलिटीचा संबंध?

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Sep 21, 2022 | 16:22 IST

What Does Your Birth Month Say about You: जानेवारी ते डिसेंबर (January to December) या सर्व 12 महिन्यांत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार (birth month) कसा असतो, हे ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या.

Personality Traits
जन्म महिन्यावरून ओळखा कसं असेल तुमचं व्यक्तीमत्त्व?  
थोडं पण कामाचं
  • व्यक्तीचा (Person's nature) स्वभाव त्याच्या जन्म तारखेवरून पाहिला जातो.
  • व्यक्तीचं जन्म महिना ही स्वभावासाठी (character) तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी (personality) महत्त्वाचा असतो. त
  • वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतात.

मुंबई: Personality according to birth month: व्यक्तीचा (Person's nature) स्वभाव त्याच्या जन्म तारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचं जन्म महिना ही स्वभावासाठी (character) तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी (personality) महत्त्वाचा असतो. त्यामुळे  जानेवारी ते डिसेंबर (January to December) या सर्व 12 महिन्यांत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार  (birth month) कसा असतो, हे ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या.

जानेवारी

जानेवारीमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या निरागसतेने आणि विनोदबुद्धीने प्रत्येकाचा मूड सेट करतात. त्यांना कोणत्याही नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात फारशी अडचण येत नाही. त्यांच्या कल्पना वेगळ्या असतात. वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतात.

अधिक वाचा-  निर्जीव Dry केसांसाठी 'या' स्पेशल Tips,चमकतील केस 

फेब्रुवारी

या महिन्यात जन्मलेले लोक प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे मालक असतात आणि ते कोणालाही प्रभावित करू शकतात. मेहनती असल्यामुळे त्यांचे करिअर, भविष्य खूप उज्ज्वल असते. अशी लोकं मनानं स्वच्छ असतात. फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव दयाळू असतो पण अनेक गोष्टींमध्ये हे लोक हट्टीही असतात.

मार्च 

मार्च महिन्यात जन्मलेले लोक मनाने इतके कुशाग्र असतात की त्यांची फसवणूक करणे प्रत्येकाच्या हातात नसते. एकदा त्यांचा विश्वास तुटला की तो परत मिळवणे अवघड असते. मार्च महिन्यात जन्मलेले लोक नातेसंबंध जपण्यात तज्ज्ञ असतात. ते कधीही त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत नाहीत.

एप्रिल

 एप्रिलमध्ये जन्मलेले लोक खूप आनंदाने कठोर परिश्रम करतात. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांचा स्वभाव रोमान्सने भरलेला आहे. ते कलाप्रेमी आहेत. त्यांना इतरांच्या भावनांचा आदर असतो. त्यांना फसवणूक सहन होत नाही.

मे

मे महिन्यात जन्मलेले लोक खूप उत्साही असतात. अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. दबावाखाली किंवा कोणाच्या दबावाखाली काम करणे हा त्यांचा स्वभाव नसतो. पटकन राग येणे, हट्टीपणा आणि मन कठोर असणे या त्यांच्या नकारात्मक बाबी आहेत.

जून

या महिन्यात जन्मलेले लोक खूप कल्पनाशील असतात. अशा लोकांमध्ये अनेक रोमांचक विचार धावत राहतात. मात्र, या लोकांचा मूड कधी बदलेल, हे माहीत नाही. या लोकांना क्षणात राग येऊ शकतो. या महिन्यात जन्मलेले लोक रोमान्सच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर असतात. त्यांच्याकडे गायन, नृत्य आणि क्रीडा यांसारख्या कलागुण असतात. 

जुलै 

जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे माहित असते. कुठे खर्च करायचा आणि कुठे बचत करायची हे त्यांना माहीत असते. त्यांचा स्वभाव अतिशय शांत असतो. अशा लोकांना करिअरमध्ये भरपूर यश मिळते.

ऑगस्ट 

ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये अद्भुत प्रतिभा दडलेली असते. कला, साहित्य आणि विविध सर्जनशील शैलींमध्ये असे लोकं छाप पाडतात. ते स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात तसंच स्पष्ट राहतात. प्रेमाच्या बाबतीत ते नात्याला फारसे महत्त्व देत नाहीत.

सप्टेंबर

सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप मेहनती असतात. आनंदी राहण्यासोबतच या लोकांना रागही लवकर येतो. पण ते आपला राग लपवून ठेवत नाहीत, तो लगेच व्यक्त करतात. हे लोक खूप सर्जनशील असतात. प्रेमाच्या बाबतीत, हे लोक प्रामाणिक जोडीदार असल्याचे सिद्ध करतात.

ऑक्टोबर

 या महिन्यात जन्मलेल्या लोकांना संपत्ती आणि प्रसिद्धी, सर्व काही त्यांच्या जवळ असते.मात्र या गोष्टींचा यांना कधीही गर्व नसतो. ते भावनिकही असतात पण त्यांचे व्यावहारिक रूप जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये दिसून येते. प्रेमाच्या बाबतीत ते ठाम असतात.

अधिक वाचा-  झोपण्यापूर्वी लावा 'ही' DIY नाईट क्रीम, चमकेल त्वचा

नोव्हेंबर 

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व असे असते की तुम्ही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. ते त्यांच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय असतात. असे लोकं खूप मेहनती असतात. त्यांना शॉर्टकट घेणे आवडत नाही. मैत्री आणि नातेसंबंधांच्या बाबतीत ते नेहमीच प्रामाणिक असतात.

डिसेंबर 

डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव व्यावहारिक असतो. ते सर्वात एकसंध लोक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण आहे. ते प्रेमाच्या बाबतीत अधिक सक्रिय असतात. त्यांना बंधनात राहून काम करायला आवडत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी