Kojagiri Purnima 2021 Marathi Greetings : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करून द्या शुभेच्छा

Sharad Purnima 2021 Marathi Greetings : यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही मंगळवारी आणि बँक हॉलीडे असल्यामुळे कोजागिरी साजरी करण्याची धम्माल असणार आहे. यंदाची ही कोजागिरी अजून भन्नाट बनविण्यासाठी कोजागिरीच्या  शुभेच्छा देऊन आपल्या मित्रपरिवारासह नातलगांसह यंदाची कोजागिरी साजरी करू शकतात. 

kojagiri purnima 2021 images kojagiri purnima hd greetings and wallpaper to make your kojagiri purnima special in this year
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा  
थोडं पण कामाचं
  • यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही मंगळवारी आणि बँक हॉलीडे असल्यामुळे कोजागिरी साजरी करण्याची धम्माल असणार आहे.
  • यंदाची ही कोजागिरी अजून भन्नाट बनविण्यासाठी कोजागिरीच्या  शुभेच्छा देऊन आपल्या मित्रपरिवारासह नातलगांसह यंदाची कोजागिरी साजरी करू शकतात. 
  • दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.

Sharad Purnima 2021 Marathi Greetings : कोजागिरी पौर्णिमेला (Kojagiri Purnima) शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यातील 'आश्‍विनी पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री 'को जागर्ती' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. (kojagiri purnima 2021 images kojagiri purnima hd greetings and wallpaper to make your kojagiri purnima special in this year)

आजकाल कोजागिरी पौर्णिमा कधीही असली तरी लोक आपल्या सोयीप्रमाणे शनिवार किंवा रविवार असा सुट्टीचा दिवस पकडून साजरी करतात. जेणेकरून त्यांना हा सण आनंदात आणि जल्लोषात साजरा करता येईल. मग रात्रभर जागरण करणे, धम्माल करणे अशी मजा त्यांना करता येते. यंदाची कोजागिरी पौर्णिमा आणि मुस्लिमांचा ईद ए मिलाद हा सण एकत्र आल्याने या दिवशी सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे कोजागिरीची तयारी करायला अनेकांना वेळ मिळाणार आहे  यंदाची ही कोजागिरी अजून भन्नाट बनविण्यासाठी कोजागिरीच्या या भन्नाट शुभेच्छा देऊन आपल्या मित्रपरिवारासह नातलगांसह यंदाची कोजागिरी करा आणखी खास...

Kojagiri pornima marathi messages

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 2

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 3

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 1

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 4.

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 5

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 7

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

Kojagiri pornima marathi messages 6

                                                Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)


कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये 'शरद पूर्णिमा', ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा', बंगालमध्ये 'लोख्खी पूजो' असे म्हणतात. उपवास, पूजन व जागरण याचे या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात. टाइम्स नाऊ  मराठीकडून तुम्हालाही कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी