Laxmi Pooja 2021 whatsApp Marathi wishes and Messages: दिवाळीतील (Diwali) सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनचा. (Laxmi Pooja) या दिवशी खऱ्या अर्थान दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीच्या चौथ्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. यावेळेस ४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनचा मुहूर्त आहे. ऑनलाईनच्या युगात आपण लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतो.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी धन, लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. एवढंच नव्हे तर धनदेवता कुबेराची देखील पूजा केली जाते. असं मानलं जातं की, दिवाळीच्या दिवशी व्यापाऱ्यांचं देखील नवं वर्ष सुरु होतं. त्यामुळेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी ते चोपडी पूजन करतात.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी आपली हिशोबाची वही बदलतात. पूजेआधी वहीच्या खात्यावर केसरयुक्त चंदनाने किंवा कुंकुने स्वस्तिक काढलं जातं. याच वही पूजनला चोपडी पूजन असं देखील म्हणतात. याच वेळी लक्ष्मीपूजन देखील केलं जातं.
दरवर्षी लक्ष्मीपूजनादिवशी मोठा जल्लोष असतो. अनेक ठिकाणी एकत्र येत हा लक्ष्मीपूजनचा सण साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे दिवाळी सण साजरी करताना आपल्याला अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अनिवार्य आहे. तसंच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके देखील न फोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. त्यामुळे यंदा लक्ष्मीपूजन देखील साधेपणाने साजरं करावं लागणार आहे.
मात्र, असं असलं तरीही आपण आपल्या दिवाळीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Laxmi Pooja wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.
(फोटो सौजन्य: Twitter)
समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती!
लक्ष्मीपूजनच्या आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
(फोटो सौजन्य: Twitter)
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!
(फोटो सौजन्य: Twitter)
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो...
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!
(फोटो सौजन्य: Twitter)
ही दीपावली सर्वांना मंगलमयी, आरोग्यदायी, सुख-समृद्धी प्रदान करणारी ठरो... लक्ष्मीपूजनच्या खूप-खूप शुभेच्छा
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!
(फोटो सौजन्य: Twitter)
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा, लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!
(फोटो सौजन्य: Twitter)
अष्टलक्ष्मी तुमच्यावर धन-धान्याच्या वर्षाव करो व लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!
(फोटो सौजन्य: Twitter)
सकलं तिमिरं हन्तु प्रज्ञालोकं तनोतु वः
भूयाद्दीपोत्सवः सोऽयं सर्वमङ्गलकारकः
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!
(फोटो सौजन्य: Twitter)
आनंदाची उधळण करणारा हा सण आपणा सर्वांस भरभरून आनंद, धन व उत्साह देवो! लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा...!