Vastu Tips: रात्रीची झोप नीट होण्यासाठी आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी वास्तुशास्त्राने सुचवलेल्या झोपेच्या सर्वोत्तम दिशा आहेत.
वास्तूनुसार सर्वोत्तम झोपेची स्थिती निश्चित केल्याने व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील वाढेल. वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. आज आपण पूर्व आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपण्याबद्दल बोलणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला डोके ठेवून झोपणे चांगले असते, तर कधीही पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नये. पूर्वेला डोके, म्हणजेच पाय पश्चिमेला ठेवून झोपणे आरोग्यासाठी चांगले असते.कारण सूर्य पूर्व दिशेतून उगवतो आणि त्याची पहिली किरणे पूर्व दिशेलाच दिसतात. त्यामुळे या दिशेला डोके ठेवून झोपल्याने सकाळचा पहिला किरण तुमच्या डोक्यावर येतो आणि तुमच्या आत नवीन ऊर्जा संचारते.
एखादी व्यक्ती घरात एकटीच कमावणारी असेल, किंवा नोकरी व्यवसायाशी निगडीत काम करणारी असेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून पूर्वेला
डोकं करून झोपावं. विद्यार्थ्यांनी पूर्वेला डोकं करून झोपावं, त्यामुळे एकाग्रता वाढते.
पूर्वेप्रमाणेच दक्षिण दिशेला डोकं करून झोपणे उत्तम मानले जाते. आरोग्यासाठी ते चांगले मानले जाते. यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात.
वैज्ञानिकदृष्ट्या ते योग्य मानले जाते. मात्र चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
दुसरीकडे, पूर्व दिशेला पाय ठेवून झोपल्याने मेंदूपर्यंत योग्य ऊर्जा पोहोचू शकत नाही. यासोबतच पूर्वेला पाय करून झोपताना तुम्ही सूर्यदेवाचा अपमानही करता. पूर्व आणि पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपण्याबाबत वास्तुशास्त्रात ही चर्चा आहे. या वास्तूशास्त्राच्या टिप्स अवलंबल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल
जेवण आणि झोप यामध्ये, किमान दोन तासांचे अंतर ठेवावे, असे सांगितले जाते. लवकर निजे, लवकर झोपे, तया आरोग्य संपन्न लाभे, दिवेलागणीच्या वेळेला, तिन्हीसांजेला झोपू नये.
झोपताना देवाचे नामस्मरण करावे, झोपताना सकारात्मक विचार करावा. झोपताना ध्यानधारणा करावी असे मानले जाते.