Work from home tips: वर्क फ्रॉम होम करताय? जाणून घ्या बसण्याची योग्य पद्धत

लाइफफंडा
Updated Apr 24, 2020 | 17:03 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Right posture during Work from home: प्रत्येकाच्या घरात ऑफिससारखंच इंफ्रास्ट्रक्चर नसतं त्यामुळं घरातून काम करतांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. जाणून घ्या घरातून काम करतांना बसण्याची योग्य पद्धत...

work from home(Source: Pixabay)
वर्क फ्रॉम होम करताय? जाणून घ्या बसण्याची योग्य पद्धत  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्या दरम्यान कोट्यवधी लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत.
  • घरातून काम करतांना ऑफिस सारखं इंफ्रास्ट्रक्चर मिळत नसल्यानं होतात अनेक त्रास.
  • काम करण्यासाठी बसण्याचा सर्वात जास्त त्रास होतो. पोश्चर नीट नसेल तर अनेक आजार होतात.

मुंबई : कोरोना व्हायरस या महामारीनं सध्या जगभरात धुमाकूळ घातलाय. सध्या कोट्यवधी लोक वर्क फ्रॉम होम म्हणजेच आपल्या घरातून काम करत आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण कमी करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले ऑफिस बंद ठेवले आहेत आणि कर्मचाऱ्यांना आपआपल्या घरातून काम करण्याची परवानगी दिलीय. अशात लोकांना आपल्या घरात राहूनच काम करण्याशिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नाहीय. घरात ऑफिससारखं इंफ्रास्ट्रक्चर नसतं, त्यामुळे अनेकांना घरातून काम करतांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र वर्क फ्रॉम होममध्ये काही चांगल्या गोष्टी पण घडतायेत. रोज वेळेवर उठून तयार व्हावं लागत नाही, दररोजच्या ट्रॅफिक जाममधून सर्वांची सध्या सुटका झालीय.

मात्र त्रास फक्त हा नाहीय. घरात ऑफिससारखा वर्किंग टेबल नसतो नाही बसण्यासाठी योग्य अशी खूर्ची असते. शिवाय ऑफिसमध्ये मिळणारं इंटरनेट कनेक्शन, त्याची स्पीड, आयटी सपोर्ट इत्यादी आपल्याला घरात मिळत नाही. सर्वाच मोठी गोष्ट म्हणजे बसण्याची व्यवस्था. कुणी आपल्या अंथरूणावर बसून काम करतं तर कुणी चेअर वर, अनेक जण जमिनीवर बसूनही काम करतात. जवळपास ८ ते ९ तासांच्या शिफ्टमध्ये अशापद्धतीनं काम करण्यासाठी बसलं तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पडतो. अशापद्धतीनं घरात काम करतांना अनेकदा आपली मान आणि पाठ दुखते, ज्यामुळे पुढे जावून खूप त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणून जेव्हा आपण घरातून काम करत असाल तेव्हा काही बेसिक गोष्टींवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

अंथरुणावर बसून काम करत असाल तर

जर आपण अंथरुणावर बसून काम करत असाल तर यासाठी आपण उशीचा वापर करू शकता. गादीवर पोटावर झोपून काम करत असाल तर आपण आपल्या हाताखाली उशी ठेवेवी सोबतच पायाखाली सपोर्टसाठी उशी ठेवावी. याशिवाय हे सुद्धा लक्षात ठेवावं सतत एकाच पोजमध्ये बसून काम करणं अव्हॉईड करावं. आपण आपली पोझिशन थोड्या-थोड्या वेळानं बदलावी यामुळे आपल्या शरीराला थोडा आराम मिळेल.

काउचवर बसून काम करत असाल तर

अनेक जण घरात सोफ्यावर बसून काम करत असतात. जर आपण सोफ्यावर बसून काम करत असाल तर आपल्या मानेला खूप त्रास होऊ शकतो. अशावेळी आवश्यक आहे आपण वेळोवेळी आपली पोझिशन बदलावी आणि पाठीला स्ट्रेच करत थोडा ब्रेक घ्यावा. जेणेकरून ताण हलका होईल.

ब्रेक घेऊन थोडा वॉक करावा

जर आपण खूप वेळापासून बसूनच असाल तर काम करतांना थोडा वेळ ब्रेक घेऊन वॉक करणं आवश्यक आहे. जर आपण दर अर्ध्यातासानंतर काही सेकंदाचा ब्रेक घेऊन थोड उभं राहावं आणि नंतर बसून पुन्हा काम सुरू करावं. आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यसाठी हे खूप फायदेशीर ठरेल.

चेहऱ्याची पोझिशन अशा पद्धतीनं ठेवा

आपण कशाप्रकारे बसतो आणि आपल्या चेहऱ्याची पोझिशन कशी असते, हे सुद्धा खूप मॅटर करतं. जेव्हा आपण काम करण्यासाठी बसता तेव्हा लक्षात ठेवा आपला चेहरा खाली झुकलेला नसावा तो नेहमी समोर असला पाहिजे. यामुळे आपल्या मानेवर आणि खांद्यावर ताण पडणार नाही.

खूर्ची अधिक उंच नसावी

आपण ज्यावर बसून काम करत आहात ते शरीरासाठी किती कंफर्टेबल आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या खूर्चीवर बसून आपण काम करत असाल ती अधिक उंच किंवा अधिक ठेंगणी पण नसावी. दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम पडू शकतो.

काऊंटरचा वापर करावा

ऑफिस सारखा सेट अप घरात बनवणं खूप कठीण आहे, मात्र प्रयत्न करावा टेबल किंवा खूर्ची समोर बॉक्स किंवा अशी कोणतं सामान ठेवावं जेणेकरून एखाद्या काऊंटरसारखा सेटअप बनेल. नंतर त्यावर लॅपटॉप ठेवून आपलं काम करावं म्हणजे मान जास्त खाली झुकणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी