Today in History Monday 1st August 2022: आज आहे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविषेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी.
 • आजच्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती.
 • आज आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती.

Today in History: 1st August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

अधिक वाचा :  Annna Bhau Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शेअर करा मराठी अभिवादनपर संदेश

१ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९९२: मृणाल ठाकूर - भारतीय अभिनेत्री
 2. १९८७: तापसी पन्नू - भारतीय अभिनेत्री
 3. १९६९: ग्रॅहॅम थॉर्प - इंग्लिश क्रिकेटपटू
 4. १९५५: अरुण लाल - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक
 5. १९५२: यजुर्वेंद्र सिंग - भारतीय क्रिकेटपटू
 6. १९४८: एव्ही अराद - मार्वल स्टुडिओचे संस्थापक
 7. १९३२: मीना कुमारी - हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: ३१ मार्च १९७२)
 8. १९२४: सर फ्रँक वॉरेल - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (निधन: १३ मार्च १९६७)
 9. १९२०: अण्णाणाऊ साठे - लेखक, कवी, समाजसुधारक (निधन: १८ जुलै १९६९)
 10. १९१५: श्री. ज. जोशी - कथाकार कादंबरीकार
 11. १९१३: मास्टर भगवान - चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (निधन: ४ फेब्रुवारी २००२)
 12. १८९९: कमला नेहरू - जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (निधन: २८ फेब्रुवारी १९३६)
 13. १८८२: पुरुषोत्तम दास टंडन - राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष - भारतरत्न (निधन: १ जुलै १९६२)
 14. १८३५: महादेव मोरेश्वर कुंटे - कवी व संस्कृतचे प्राध्यापक (निधन: ८ ऑक्टोबर )
 15. १७४४: जीन बाप्टिस्टे लॅमार्क - फ्रेंच शास्त्रज्ञ (निधन: १८ डिसेंबर १८२९)
 16. इ. स. पू १०: क्लॉडियस - रोमन सम्राट

अधिक वाचा :  Vinayak Chaturthi : विनायक चतुर्थीनिमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter, आणि Social Media वर मराठीतून द्या शुभेच्छा


१ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २००८: के२ शिखर - ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.
 2. २००८: बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे - जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.
 3. २००१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ - स्थापना.
 4. १९९६: राजकुमार - कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 5. १९९४: भारतीय रेल्वे - प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
 6. १९८१: एम.टी.व्ही. (MTV) - चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.
 7. १९८०: विग्डीस फिनबोगाडोत्तिर - या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.
 8. १९६१: डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA), अमेरिका - संस्थेची सुरवात.
 9. १९६०: पाकिस्तान - इस्लामाबाद शहर राजधानी बनले.
 10. १९६०: बेनिन - देशाने फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.
 11. १९५७: नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) - अमेरिका आणि कॅनडा देशांनी स्थापना केली.
 12. १९४४: दुसरे महायुद्ध - वॉर्सॉ, पोलंड देशात नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
 13. १९४३: दुसरे महायुद्ध - ब्लॅक संडे: ऑपरेशन टायडल वेव्ह: अमेरिकन सैन्याचा रोमानिया देशातील तेलसाठे नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न.
 14. १९३६: ऑलिम्पिक - बर्लिन, जर्मनी मध्ये १९३६च्या ऑलिम्पिक स्पर्धाना सुरवात.
 15. १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले, इथूनच पहिल्या महायुद्धाची सुरवात.
 16. १९११: हॅरिएट क्विंबी - एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला बनल्या.
 17. १८९४: पहिले चीन-जपानी युद्ध - सुरू.
 18. १८७६: अमेरिका - कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
 19. १८५५: मॉन्टे रोझा - या आल्प्स पर्वत रांगेतील दुसरे सर्वोच्च शिखरावर पहिली यशस्वी चढाई.
 20. १८३४: ब्रिटिश साम्राज्य - गुलामगिरी निर्मूलन कायदा १८३३ नुसार ब्रिटिश साम्राज्यात (ईस्ट इंडिया कंपनी वगळून) गुलामगिरी संपुष्टात आली.
 21. १८००: युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड - ग्रेट ब्रिटनआणि आयर्लंडचे राज्य विलीन करून स्थापन झाले.
 22. १७७४: ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
 23. १४९८: ख्रिस्तोफर कोलंबस - व्हेनेझुएला देशाला भेट देणारे पहिले युरोपियन बनले.

अधिक वाचा :  Lokmanya Tilak Quotes : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार शेअर करून करा अभिवादन

१ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २००८: हरकिशनसिंग सुरजित - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: २३ मार्च १९१६)
 2. २००८: अशोक मांकड - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १२ ऑक्टोबर १९४६)
 3. २००५: फहाद - सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१)
 4. १९९९: निराद चौधरी - बंगाली साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७)
 5. १९२०: बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य (जन्म: २३ जुलै १८५६)
 6. ११३७: लुई (सहावा) - फ्रान्सचा राजा (जन्म: १ डिसेंबर १०८१) 

अधिक वाचा : Chanakya Neeti: यश, धनसंपत्ती हवी असल्यास चार अवगुणांपासून लांब राहा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी