Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणाचा शरीराच्या या अवयवांवर होऊ शकतो परिणाम, घ्या खबरदारी

Lunar Eclipse 2022 effect on human body and health impact soul eye mind on grahan : चंद्रग्रहणावेळी पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो. या नकारात्मक ऊर्जेचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होऊ शकतो.

Lunar Eclipse 2022 effect on human body and health impact soul eye mind on grahan
चंद्रग्रहणाचा शरीराच्या या अवयवांवर होऊ शकतो परिणाम, घ्या खबरदारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चंद्रग्रहणाचा शरीराच्या या अवयवांवर होऊ शकतो परिणाम, घ्या खबरदारी
  • चंद्रग्रहणाचा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होईल असे समजतात....
  • चंद्रग्रहण बघितले तर डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो असे म्हणतात

Lunar Eclipse 2022 effect on human body and health impact soul eye mind on grahan : यंदाच्या वर्षातले पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवार १६ मे २०२२ रोजी आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे देशात कुठेही चंद्रग्रहणाचे सूतक लागू नसेल. चंद्रग्रहण सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी संपेल. चंद्रग्रहणाशी संबंधित अनेक समज आणि प्रथा परंपरा आहेत. यातील काही कालौघात मागे पडल्या आहेत तर काही आजही सुरू आहेत. ज्यांचा या सगळ्यावर विश्वास आहे ते असे समजतात की चंद्रग्रहणावेळी पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो. या नकारात्मक ऊर्जेचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी चंद्रग्रहणावेळी काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे, काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. 

चंद्रग्रहणाचा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होईल असे समजतात....

  1. चंद्रग्रहण बघितले तर डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो असे म्हणतात. याच कारणामुळे चंद्रग्रहण सुरू असताना घराबाहेर पडू नये तसेच चंद्रग्रहण बघू नये असेही सांगतात.
  2. चंद्रग्रहणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे म्हणतात. याच कारणामुळे चंद्रग्रहण सुरू असताना घराबाहेर पडू नये तसेच चंद्रग्रहण बघू नये असेही सांगतात. यामागील एक शास्त्रीय कारण असेही आहे की, चंद्रग्रहणाच्यावेळी अतीनील किरण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर येत असतात. हे किरण माणसाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकतात.
  3. चंद्रग्रहणाचा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळेच चंद्रग्रहणाच्या काळात खाणेपिणे टाळावे असे सांगतात. चंद्रग्रहणाच्या कालावधीत स्वयंपाक करू नये तसेच चंद्रग्रहण सुरू होण्याआधी केलेले पदार्थ ग्रहण संपल्यानंतर खाऊ नये असेही सांगतात. 
  4. नाईलाज म्हणून ग्रहणाआधी केलेले पदार्थ ग्रहण संपल्यानंतर खाणार असाल तर त्या पदार्थांमध्ये तुळशीची पानं टाकून नंतर ते पदार्थ खावे असे सांगतात. 
  5. चंद्रग्रहणाचा परिणाम गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भातील अर्भकावर होण्याचा धोका असतो. याच कारणामुळे चंद्रग्रहण काळात  गरोदर महिलांनी चंद्र किंवा सूर्य यांना बघू नये किंवा त्यांचा प्रकाश पडेल अशा मोकळ्या भागात अथवा रस्त्यावर जाऊ नये, प्रवास टाळावा असे सांगतात.

कसे होते चंद्रग्रहण

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मधे येते त्यावेळी सूर्याचा प्रकाश चंद्राकडे पोहोचण्याच्या मार्गात पृथ्वी हा अडथळा असतो. पौर्णिमेला ही परिस्थिती निर्माण झाल्यास चंद्रग्रहणाचा कालावधी दोन तासांपेक्षा जास्त असतो. यंदाही तसेच आहे. चंद्रग्रहणाचा कालावधी पाच तासांपेक्षा जास्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी