५२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झाले होते मधुबालाचे निधन, केवळ ३६ वर्षे होतं वय

१०६९ मध्ये २३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आजच्या दिवशी हिंदी सिनेमातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री, मधुबाला यांचे निधन झाले होते. त्या केवळ ३६ वर्षांच्या होत्या.

Madhubala Died 52 years ago on this day when she was 36
मधुबाला   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • १९६९ मध्ये आजच्या दिवशी झाले होते मधुबाला यांचे निधन
  • त्या केवळ ३६ वर्षांच्या होत्या
  • त्या त्यांच्या सुंदर दिसण्यासाठी व हावभावासाठी प्रसिद्ध होत्या

नवी दिल्ली : एखाद्या सुंदर चेहेऱ्यकडे पहिल्यास आपल्या तोंडून वाह! कितनी फुरसतसे बनाया होगा बनानेवालेने, असे आपसूक निघून जाते. हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्याबद्दल तर आपण नक्कीच असे म्हणू शकतो. मधुबालाने प्रत्येक सिनेमात आपल्या कलेची आणि सौंदर्याची मोहिनी टाकली आहे. मग ती मुघल पेहेरावातली ‘मुघल-ए-आझम’ असेल किंवा किशोर कुमार यांचा विनोदी चित्रपट ‘चलती का नाम गाड़ी’,  मधुबाला यांच्या मोहक अभिनयाने आजरामर झाले आहेत. १४ फेब्रुवारी १९३३ ला जन्मालेल्या मधुबाला यांना त्यांच्या सौंदर्यामुळे ‘व्हिनस ऑफ हिंदी सिनेमा’ म्हटले जायचे. चित्रपटांच्या जगतात मधुबाला यांचा प्रवास खूप कमी काळाचा होता. त्या केवळ ३६ वर्षांच्या असताना २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

देश आणि जगाच्या इतिहासात २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या इतर घटनांच्या इतर महत्वपूर्ण घटना पुढील प्रमाणे आहेत.

१७६८ : कर्नल स्मिथने हैदराबादच्या निजामाशी शांती प्रस्तावावर सही केली होती. याअंतर्गत निजामने ब्रिटिश अधिपत्य. स्वीकार केले.

१८८६: अमेरिकेचे वैज्ञनिक आणि रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेलने ऍल्युमिनिअमचा शोध लावला.

१९४५ : अमेरिकेने जपानच्या वर्चस्वाखालील ईवो जीमा या बेटावर आपला ध्वज फडकवला. हे बेट युद्धाच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण होते. 

१९५२: कर्मचारी भविष्य निधी आणि विविध योजनांना मंजुरी. 

१९६४: चीनने आपली भूमिका बदलत कश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे समर्थन केले.

१९६९: हिंदी सिनेमातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री मधुबाला यांचे निधन.

१९८१: स्पेनमध्ये दक्षिणपंथी लष्कराने सरकार पाडले, यामुळे राजनैतीक अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली होती. 

२००४: हिंदी चित्रपटातील प्रतिभावान अभिनेता, पटकथकार, निर्माते, दिग्दर्शक आणि निर्देशक विजय आनंद यांचे निधन. त्यांचा ‘गाइड’ या सिनेमाला भारतीय सिनेमातील उत्कृष्ट सिनेमात गणले जाते. 
२००६ : भारताने पाकिस्तानला सर्वात महत्व  प्राप्त झालेल्या राष्ट्राचा दर्जा देनण्याची शिफारस मंजूर केली.
२००९: चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात धुम्रपाणाचे दृश्य दाखवण्यावरील निर्बंध हटवले.

२०१०: कतारने  प्रसिद्ध भारतीय चित्रकार एम.एफ.हुसैन यांना आपल्या देशाचे नागरिकत्व दिले. 
२०२०: अंतरराष्ट्रीय न्यायालया (आईसीजे) ने  रोहिंग्या मुस्लिमांना संरक्षण देण्याचे महत्वपूर्ण आदेश म्यानमारला दिले. 

२०२०: ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी ब्रिटिश सरकारच्या ब्रेक्झीट कायद्यास मंजूरी दिली.
२०२०: भ्रष्टाचात भारताचे स्थान ८० पर्यंत खाली घसरले. डेनमार्क आणि न्यूझीलंड यांनी आपले प्रथम स्थान अबाधित राखले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी