Maharana Pratap Jayanti 2022 Wishes In marathi : आज महाराणा प्रताप यांची तिथीप्रमाणे जयंती आहे. महाराणा प्रताप हे मूळचे राजस्थानचे, असे असले तरी महाराष्ट्रात त्यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी केले जाते. मोघल बादशहा अकबराने राजस्थानमधील अनेक संस्थानांवर आक्रमणे केली तेव्हा काही राजांनी आपल्या मुलींचा विवाह अकबराशी लावून दिला आणि आपले राज्य सुरक्षित करून घेतले. परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराच्या हाताखाली राज्य करण्यास नकार दिला. त्यामुळे अकबराने महाराणा प्रताप यांच्या चितोड संस्थानावर हल्ला केला. महाराणा प्रताप यांनी आपली राजधानी गोगुंड येथे हलवली आणि मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला. गोंगुडमध्ये नवी राजधानी वसवल्यानंतर महाराणा प्रताप यांनी अभेद्य किल्ला बांधला आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज फौज निर्माण केली.
त्यानंतर अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या हळदीघाटात युद्ध झाले. महाराणा प्रताप हे युद्ध हरले परंतु त्यानंतरही महाराणा प्रताप अकबराच्या हाती लागले नाही. त्यानंतर महाराणा प्रताप अकबराशी गनिमी काव्याने लढत होते. राजस्थानच्या दरी खोर्यातून त्यांनी मोघल सैन्याला घाम फोटला. त्यांचा खजिना लुटला, रसद तोडली त्यामुळे मोघल फौज पुरती हैराण झाली. अकबराची फौज माघारी परताच महाराणा प्रताप यांनी आपले सर्व किल्ले परत जिंकून घेतले आणि १२ वर्षे राज्ये केले. मोघल सत्तेपुढे न झुकता महाराणा प्रताप यांनी राज्य केले त्यामुळे ते इतिहासात अजरामर झाले. आज त्यांची जयंती त्यामित्ताने मराठी शुभेच्छा शेअर करा