Maharashtra Day 2021 messages : महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day SMS, Status, Quotes

Maharashtra Day 2021 Marathi messages । महाराष्ट्र दिन Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता

Maharashtra Day 2021 messages SMS Status Quotes Wishes in Marathi for Whatsapp facebook
Maharashtra Day 2021 messages : महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 

थोडं पण कामाचं

  • . यंदा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन हा पहिल्या शनिवारी येणार आहे. 
  • अवघ्या मराठी मनाला अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन
  • या संयुक्त महाराष्ट्राची  राजधानी मुंबई  झाली. पण ती मिळवणे सोपे नव्हते.

Maharashtra Day 2021: अवघ्या मराठी मनाला अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. या संयुक्त महाराष्ट्राची 
राजधानी मुंबई  झाली. पण ती मिळवणे सोपे नव्हते. यंदा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन हा पहिल्या शनिवारी येणार आहे. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांना पहिल्या शनिवारी सुट्टी मिळाली आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले. मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरून प्रचंड संघर्ष झाला. दिल्लीचा डाव हाणून पाडत मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. या कार्यात सुमारे 105 मराठी बांधव हुतात्मे झाले. अशा या खास दिवशी हुतात्मांना अभिवादन करून या संयुक्त महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त   Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. Happy Maharashtra Day 2020 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Quotes, Hike Stickers च्या माध्यमातून शेअर करा. 

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा  (Maharashtra Day 2021 Marathi messages)

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन!

माती झालो तर महाराष्ट्राची होईन!

तलवार झालो तर भवानी मातेची होईन!

 Maharashtra day Massages

कपाळी केशरी टिळा लावितो

महाराष्ट्र देशा तुला वंदितो

जय जय महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Maharashtra day Massages


भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,

आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..

जय जय महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Maharashtra day Massages

माझा माझा महाराष्ट्र माझा,

मनोमनी वसला शिवाजी राजा,

वंदितो या भगव्या ध्वजा,

गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…

गर्जा महाराष्ट्र माझा…!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

!!!जय महाराष्ट्र!!!

 Maharashtra day Massages
 

महाराष्ट्र निर्मिती आणि हुतात्म्यांचा लढा

तो दिवस होता 21 नोव्हेंबर इ.स. 1956. या दिवशी मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात तणाव होता. राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावर प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्राला देणे नाकारले. आयोगाच्या या निर्णयावर मराठी मन दुखावले. मराठी माणूस जागा झाला. मराठी माणसे चिडली. संपूर्ण राज्यासह मुंबईभर मोर्चे, सभा, आंदोलने होऊ लागली. यातच मोठे संघटन उभा राहिले. कामगारांचा एक विशाल मोर्चा तत्कालीन सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन परिसरात जमला. हा जनमुदाय चर्चगेट आणि बोरीबंदर (आताचे सीएसएमटी) अशा दोन्ही बाजूंनी आला. सरकारविरोधी घोषणा आणि मुंबईची मागणी यावर या मोर्चाचा भर होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी