Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'हे' धबधबे तुम्हाला देतील फॉरेन लोकेशनचा अनुभव, एकदा नक्की भेट द्या

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 28, 2022 | 10:56 IST

Famous Waterfalls: गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने राज्यातील पर्यटन स्थळाचे सौंदर्य खुलले आहे. धबधब्याचे नयनरम्य (rainy season) दृश्य पाहण्यासाठी पर्यटक राज्यातील (tourists) वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.

Waterfall
महाराष्ट्रातील 'हे' धबधबे देतील फॉरेन लोकेशनचा अनुभव 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात (Maharashtra) यंदा चांगला पाऊस (rains) झाला आहे.
  • या पावसामुळे राज्यातील प्रसिद्ध धबधब्याचं (famous waterfall) दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.
  • धबधब्याचे नयनरम्य (rainy season) दृश्य पाहण्यासाठी पर्यटक राज्यातील (tourists) वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.

मुंबई: Famous Waterfalls Of Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra)  यंदा चांगला पाऊस (rains) झाला आहे. या पावसामुळे राज्यातील प्रसिद्ध धबधब्याचं (famous waterfall) दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पावसाळ्यात धबधब्यांचे सौंदर्य वाढते.  गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने राज्यातील पर्यटन स्थळाचे सौंदर्य खुलले आहे.  धबधब्याचे नयनरम्य (rainy season) दृश्य पाहण्यासाठी पर्यटक राज्यातील (tourists) वेगवेगळ्या  ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही धबधब्यांबद्दल सांगणार आहोत. (Maharashtra These Famous waterfalls give feel of foreign location visit atleast once read in marathi)

नाणेघाट धबधबा: 

महाराष्ट्रातील नाणेघाट धबधब्याचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच खुलते. राज्याची राजधानी मुंबई येथून तुम्ही येथे फक्त 3 तासात पोहोचू शकता. हे ठिकाण एडवेंचर स्पोर्ट लोकांचेही आवडते मानले जाते, कारण येथे ट्रेकिंग करण्याचीही एक वेगळीच मजा आहे.

अधिक वाचा-  वजन कमी करायचे आहे पण दिवसभर भूक लागते, मग क्रेव्हिंग कमी करण्यासाठी खा 'या' 5 गोष्टी

कावळशेत प्वॉईंट 

पावसाळा संपण्यापूर्वी महाराष्ट्रातील कावळशेत पॉईंटला नक्की भेट द्या, कारण पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य द्विगुणित होते. कोसळणारा धबधबा आणि हिरवळ मनाला द्विगुणित आनंद देते. 

अंजनेरी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अंजनेरीचे निसर्गसौंदर्य पाहून तुम्ही आनंदी व्हाल. पावसाळ्यात ही जागा किती सुंदर दिसली असेल याची कल्पना करा. 

लिंगमळा धबधबा

महाबळेश्वरमध्ये सर्वांत प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आहे. या धबधब्याला लोकं सर्वाधिक भेट देतात. या झऱ्यांचा मुख्य स्त्रोत वेण्णा व्हॅली आहे, जिथून 600 फूट उंचीवरून पाणी पडताना दिसतं. या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर दृश्य पाहायला मिळेल. 

दूधसागर धबधबा

हा दूधसागर धबधबा महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील गोवा आणि कर्नाटकाच्या वेशीवर आहे. धबधब्याची उंची सुमारे 1020 फूट आहे. या धबधब्यांना भेट देण्यासाठी बहुतांश लोकं हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील येत अशतात. गोव्यात फिरायला  येणारे लोकं या धबधब्याला आवर्जुन भेट देतात.

कुन फॉल्स धबधबा

हा धबधबा लोणावळा आणि खंडाळा या दुहेरी हिल स्टेशनच्या मध्यावर आहे. या धबधब्यांची उंची 659 फूट आहे. या कुन फॉल्समधील पाणी पांढर्‍या दुधासारखे दिसते त्यामुळे धबधब्याची सुंदरता अजून वाढते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी