Mahatma Gandhi Quotes : महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंती निमित्त शेअर करा त्यांचे अनमोल विचार

बापूंनी ब्रिटिंशाच्या जुलमी अत्याचाराविरोधात कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलन छेडले होते. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आज महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. आज महात्मा गांधी यांचे विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा.

Mahatma Gandhi Quotes :
महात्मा गांधीचे अनमोल विचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बापूंनी ब्रिटिंशाच्या जुलमी अत्याचाराविरोधात कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलन छेडले होते.
  • अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.
  • आज महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. आज महात्मा गांधी यांचे विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा.

Mahatma Gandhi Quotes : आज 2 ऑक्टोबर 2022. आज महात्मा गांधी यांची 153 जयंती. अहिंसा आणि असहकार सारख्या शस्त्रातून महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूंना महात्मा अशी पदवी दिली होती. बापूंचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. गांधी यांनी लंडनमधून वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेत काही वेळ स्थायिक होते. त्यानंतर बापू भारतात परतले. गांधी यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बापूंनी भारतात प्रवास केला आणि देश जाणून घेतला. (mahatma gandhi jayanti 2022 153 birth anniversary share his great quotes in marathi )

महात्मा गांधींनी बिहारमध्ये 1917 साली शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले. बिहारच्या चंपारण्यमध्ये निळीच्या शेतकर्‍यांचे ब्रिटिशांकडून शोषण होत होते, तेव्हा गांधींनी याविरोधात आवाज उठवला आणि सत्याग्रह केला. तेव्हा ब्रिटिशांनी माघार घेत वेठबिगारी बंद केली आणि शेतकर्‍यांकडून कमी सारा घेतला जाईल से ब्रिटिशांनी जाहीर केले. त्यानंतर बापूंनी मिठासाठी दांडी मार्च काढला, ब्रिटिंशाच्या जुलमी अत्याचाराविरोधात कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोडे आंदोलन छेडले होते. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आज महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. आज महात्मा गांधी यांचे विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा.

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत. - महात्मा गांधी


आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे. - महात्मा गांधी

आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. - महात्मा गांधी

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. - महात्मा गांधी

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. - महात्मा गांधी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी