Mahavir Jayanti 2021 Wishes: महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना मराठी Messages, Greetings, Whatsapp Status

महावीर जयंतीच्या शुभेच्छा देणारे हे मराठी Messages, Greetings, Images तुम्ही Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करू शकता.

mahavir jayanti 2021 wishes in marathi messages greetings
Mahavir Jayanti Wishes: महावीर जयंतीच्या मराठी शुभेच्छा  

थोडं पण कामाचं

  • जैन संप्रदयातील एक महत्वाचा सण म्हणजे महावीर जयंती (Mahavir Jaynati).
  • जैन धर्माचे 24 वे तीर्थांकार महावीर स्वामी (Mahavir Swami)  यांचा जन्म दिवस म्हणजेच महावीर जयंती
  • यंदा 25  एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे.

Mahavir Jayanti 2021 Marathi Wishes: जैन संप्रदयातील एक महत्वाचा सण म्हणजे महावीर जयंती (Mahavir Jaynati). जैन धर्माचे 24 वे तीर्थांकार महावीर स्वामी (Mahavir Swami)  यांचा जन्म दिवस म्हणजेच महावीर जयंती. यंदा 25  एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जैन संप्रदाय पसरलेला आहे. व्यापारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात जैन समुदाय आहे. ते महाराष्ट्राशी आणि मराठी मातीशी एकरूप झाले आहेत. 

भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला होता.  दरवर्षी यानिमित्ताने अनेक जैन बांधव भजन संध्येसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा सर्व सणांवर कोरोना (Coronavirus) संकटाचे सावट असल्याने मोठा उत्सव साजरे करणे तरी शक्य होणार नाही, मात्र त्यामुळे सणांचे महत्व काही कमी होत नाही.

तुमच्या ओळखीतील जैन बांधवाना या खास दिवसाच्या शुभेच्छा अस्सल मराठीतून देता याव्यात यासाठी आम्ही काही विशेष शुभेच्छापत्र तयार केली आहेत.  महावीर जयंतीच्या शुभेच्छा देणारे हे मराठी Messages, Greetings, Images तुम्ही Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करू शकता. 


महावीर जयंतीच्या शुभेच्छा

​Mahavir Jayanti 2021 Wishes - (photo - bccl)

जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा

​Mahavir Jayanti 2021 Wishes - (photo - bccl)

अहिंसेचा मार्ग दाखवून

जगाला प्रेमाची शिकवण देणारे

जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर

महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

विनम्र अभिवादन

Mahavir Jayanti 2021 Wishes

​Mahavir Jayanti 2021 Wishes - (photo - bccl)

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या 

भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त 

सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा

​Mahavir Jayanti 2021 Wishes - (photo - bccl)

अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्रीची शिकवण देणाऱ्या

महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

त्रिवार अभिवादन

Mahavir Jayanti 2021 Wishes

​Mahavir Jayanti 2021 Wishes - (photo - bccl)

जगा आणि जगू द्या हा

संदेश देणारे भगवान महावीर

यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन

Mahavir Jayanti 2021 Wishes

​Mahavir Jayanti 2021 Wishes - (photo - bccl)

जैन संप्रदयामध्ये महावीर जयंतीचा उत्सव अगदी आनंदात साजरा केला जातो. भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला सत्य, प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले. आपल्याला सुद्धा चिंतामुक्त जीवन जगायचे झाल्यास महावीरांच्या या विचारणा आचरणात आणून पाहावे, वास्तविक हेच खऱ्या अर्थाने त्यांनी अभिवादन ठरेल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी