Makar Sankranti 2022 : या वर्षी दोन दिवस मकर संक्रात; जाणून घ्या कारण

Makar Sankranti 2022 | नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीच्या सणाबाबत पंचांगात यंदा मात्र एकमत नाही. त्यामुळे यंदाचा संक्रांतीचा सण दोन दिवस साजरा होणार आहे. मिथिला विश्वविद्यालयाच्या पंचांगानुसार, संक्रांतीचा पवित्र कालावधी शुक्रवार १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. त्यामुळे याच दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.

Makar Sakranti festival for this year will be two days long due to the change in the Almanac
या वर्षी दोन दिवस मकर संक्रात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीच्या सणाबाबत पंचांगात यंदा मात्र एकमत नाही.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
  • बनारसी पंचांगानुसार, सुर्याचे राशी परिवर्तन १४ जानेवारीला रात्री ८.३४ वाजता होईल. ज्याचा संपण्याचा कालावधी १५ जानेवारीला दुपारपर्यंत राहील. 'उदया' तिथी वैध असल्याने संक्रांतीचा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे.

Makar Sankranti 2022 in marathi  | नवी दिल्ली : नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीच्या सणाबाबत पंचांगात ( Almanac) यंदा मात्र एकमत नाही. त्यामुळे यंदाचा संक्रांतीचा सण दोन दिवस साजरा होणार आहे. मिथिला विश्वविद्यालयाच्या पंचांगानुसार, संक्रांतीचा पवित्र कालावधी शुक्रवार १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. त्यामुळे याच दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ज्या वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत चालला आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. हे पाहता अंघोळीसाठी गंगेच्या काठी न जाता घरीच गंगेच्या पाण्यात स्नान करून सण साजरा करण्याचा सल्ला दिला जात आहे. बनारसी पंचांगानुसार, सुर्याचे राशी परिवर्तन १४ जानेवारीला रात्री ८.३४ वाजता होईल. ज्याचा संपण्याचा कालावधी १५ जानेवारीला दुपारपर्यंत राहील. 'उदया' तिथी वैध असल्याने संक्रांतीचा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सुर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जाईल. तर सुर्यास्त होताच मांगलिक कामे सुरू होतील. (Makar Sakranti festival for this year will be two days long due to the change in the Almanac).  

गंगाजल पाण्यात टाकून घरीच स्नान करा

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषाचार्य पंडित राकेश झा यांच्या मते, गंगेत स्नान केल्याने अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य मिळते. पण यावेळी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लोकांना घरातच ठेवलेले पवित्र पाणी पाण्यात मिसळून गंगेत स्नान करण्याचे पुण्य मिळू शकते. दरम्यान लोक "गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति।। नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं कुरु। या श्लोकाचे वाचन करून देखील घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. शास्त्रात सुर्याच्या उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायन हा देवांची रात्र मानला जातो.

Also Read : मुकेश अंबानींचे नवीन हॉटेल Mandarin Oriental ची वैशिष्ट्ये

तीळ आणि खिचडीचे महत्व

मकर सक्रांतीच्या दिवशी तीळ आणि खिचडीला विशेष महत्त्व आहे. मकर राशीचा स्वामी शनि आणि राहू सुर्याच्या विरुद्ध असल्यामुळे विपरीत परिणाम टाळण्यासाठी तिळाचा विशेष वापर केला जातो. उत्तरायण असताना सुर्याचा प्रकाश अधिक तीव्र होत असतो. असे मानले जाते की भगवान विष्णूलाही तीळ खूप आवडतात. तीळाचे सेवन केल्याने थंडीच्या काळात शरीरात उष्णता राहते.

टपाल विभागाकडून ३० रूपयांत गंगाजल

लक्षणीय बाब म्हणजे टपाल खात्याकडून मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गंगाजल उपलब्ध करण्याची विशेष तयारी केली आहे. यावेळी करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नदीतीरी गर्दी जमवण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे टपाल विभागावरच श्रध्दाळू अवलंबून असतील. पोस्ट विभागानुसार, जीपीओमध्ये गंगाजलची २०० मिलीची बाटली ३० रुपयांना उपलब्ध आहे. त्याची विक्री करोनाच्या नियमांचे पालन करून केली जात आहे. हे गंगोत्रीचे गंगाजल आहे. जीपीओ व्यतिरिक्त गंगाजल जवळच्या पोस्ट ऑफिसमधून देखील खरेदी केले जाऊ शकते. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंगा घाट किंवा गर्दीच्या ठिकाणी विशेष काउंटर उभारण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी