Vastu Tips: घरात सुख नांदण्यासाठी किचनमध्ये करा बदल; या दिशेला बांधा खिडकी 

Vastu Tips In Marathi | वास्तुशास्त्रामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी अनेक आरोग्यदायी उपाय सांगितले आहेत. यामध्ये व्यक्तीने काय केल्याने लाभ मिळेल आणि काय केल्याने घरात नकारात्मकरता पसरेल याची माहिती सांगितली आहे.

Make changes in the kitchen to make the house happier, Build a window in this direction
घरात सुख नांदण्यासाठी किचनमध्ये करा असा बदल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी अनेक आरोग्यदायी उपाय सांगितले आहेत.
  • किचन रूममधील भींती लाल किंवा नारंगी रंगाच्या असल्याने भींतीमधून सकारात्मक ऊर्जा वाहत असते. 
  • किचन रूममध्ये गळती लागणे हे दरिद्रतेचे संकेत असतात

Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी अनेक आरोग्यदायी उपाय सांगितले आहेत. यामध्ये व्यक्तीने काय केल्याने चांगला लाभ मिळेल आणि काय केल्याने घरात नकारात्मकरता पसरेल याची माहिती सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकगृह अर्थात किचन हा घरातील एक महत्त्वाचा भाग आहे. स्वयंपाकघर यासाठी महत्त्वाचे आहे कारण तिथे घरातील सदस्यांचे भोजन आणि आरोग्याशी संबंधित गोष्टी असतात. (Make changes in the kitchen to make the house happier, Build a window in this direction). 

अधिक वाचा : वर्षभर राहूची या राशींवर राहणार विशेष कृपा

स्वयंपाकघराचे वास्तू 

स्वयंपाकघरातील वास्तू ठीक करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. लक्षणीय बाब म्हणजे वास्तुशास्त्रानुसार, किचन रूममधील भीतींचा रंग गा लाल किंवा केशरी असणे गरजेचे आहे. 

लालच रंग का? 

किचन रूममधील भींती लाल किंवा नारंगी रंगाच्या असल्याने भींतीमधून सकारात्मक ऊर्जा वाहत असते. 

सिंक बनवा 

दरम्यान स्वयंपाकघरामध्ये सिंक ईशान्य म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला बनवावे. तसेच स्वयंपाकघरातील ईशान्य कोपर्‍यात वॉटर प्युरिफायर देखील लावा. 

गळती नसावी

वास्तूनुसार, किचन रूममध्ये गळती लागणे अथवा कुठे लीकेज असणे हे दरिद्रतेचे संकेत असतात, त्यामुळे लीकेज लगेचच दुरूस्त केले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार किचन रूमचे प्रवेशद्वार हे पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला असले पाहिजे, मात्र कोणत्याही कोपऱ्यात नसावे. 

चुलीची दिशा

वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये दक्षिण किंवा पूर्व दिशेला चुल असली पाहिजे. तसेच जेवण करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे. तसेच शास्त्रानुसार किचनमध्ये दोन खिडक्या असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यातून नकारात्मकता बाहेर जाऊ शकेल. 

या दिशेला बनवा खिडकी

स्वयंपाकगृहामध्ये पूर्व दिशेला खिडकी किंवा ॲडजस्ट फॅन लावला पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी