Hair Care: या Natural हेअर पॅकने केस करा काळे, घरच्या घरी कसा बनवायचा Pack जाणून घ्या

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Oct 26, 2022 | 15:50 IST

Hair Care: लोक केसांना कलर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर प्रोडक्ट वापरतात. ज्यात केमिकल भरपूर असते आणि खूप महागही असते.

Hair Care
या Natural हेअर पॅकने केस करा काळे 
थोडं पण कामाचं
  • चुकीची जीवनशैली, कमजोर पचनशक्ती यामुळे आता लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत.
  • लोक केसांना कलर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर प्रोडक्ट वापरतात.
  • तुमच्या केसांना आणखी नुकसान होऊ शकते.

मुंबई: Hair Care: केस गळणे (Hair loss) ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. चुकीची जीवनशैली, कमजोर पचनशक्ती यामुळे आता लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत लोक केसांना कलर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर प्रोडक्ट वापरतात. ज्यात केमिकल भरपूर असते आणि खूप महागही असते. हे वापरल्याने तुमच्या केसांना आणखी नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला तुमचे केस पांढरे होण्यापासून रोखायचे असेल तर या घरगुती टिप्स (home remedies) अवश्य फॉलो करा.

कांद्याचा हेअर पॅक

कांद्यामध्ये असे काही घटक असतात, जे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. तुम्ही कांदा किसून त्याचा रस काढा, त्यानंतर केसांना मसाज करा. यामुळे तुमचे केस वाढण्यास मदत होईल, तसेच तुमचे केस काळे राहतील.

अधिक वाचा-  आजपासून 24 दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ 

शिककाई

केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी शिककाई ही सर्वात प्रभावी हेअर पावडर आहे. ही पावडर दह्यात मिसळून केसांना लावू शकता.  केसांना लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा.

तुळस

केस काळे करण्यासाठीही तुळशीचा उपयोग होतो. हे करण्यासाठी एक वाटी पाणी घ्या, त्यात तुळशीची पाने टाका. आता ते उकळवा. थंड झाल्यावर आता या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून किमान दोनदा या पाण्याने धुवा. तुम्हाला फरक दिसेल.

बटाटा

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही बटाटा आणि दही वापरू शकता. हा पॅक बनवण्यासाठी पॅन घ्या, त्यात दोन कप पाणी घालून बटाटे उकळा. त्या पाण्यात 2 चमचे दही चांगले मिसळा. ते टाळू आणि केसांवर लावा. नंतर केस सुकल्यानंतर धुवा.

Disclaimer: लेखात दिलेल्या टिपा आणि युक्त्या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी