Ganesh Chaturthi 2022: 'या' गणेश चतुर्थीला बनवा खास बेसन बर्फी, चवीला लागते एकदम स्वादिष्ट

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 28, 2022 | 14:12 IST

Besan Barfi Recipe: आज आम्‍ही तुम्‍हाला बेसनाची बर्फी बनवण्‍याच्‍या (Besna Barfi recipe) रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी खाण्‍याला तर खूप चविष्ट तर होतेच त्याशिवाय बनवण्‍यासही खूप सोपी असेल.

Ganesh Chaturthi 2022 Besan Barfi Recipe
गणेश चतुर्थी 2022 
थोडं पण कामाचं
  • यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) आहे.
  • गणेश चतुर्थीला खास मोदक (special Modak) बनवण्याची परंपरा आहे. कारण गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत.
  • बेसनाची बर्फी हा खूप चांगला पर्याय आहे.

नवी दिल्ली: Ganesh Chaturthi 2022 Besan Barfi Recipe: यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) आहे. गणेश चतुर्थीला खास मोदक  (special Modak) बनवण्याची परंपरा आहे. कारण गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत. मात्र, यावेळी तुम्ही बेसन बर्फीही (besan barfi) बनवू शकता. बेसन बर्फी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आता हवामानही बदलत आहे आणि बदलत्या ऋतूत गरमागरम पदार्थ खावेत, जेणेकरून सर्दी-खोकल्याचा त्रास होणार नाही. यासाठी बेसनाची बर्फी हा खूप चांगला पर्याय आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला बेसनाची बर्फी बनवण्‍याच्‍या (Besna Barfi recipe)  रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी खाण्‍याला तर खूप चविष्ट तर होतेच त्याशिवाय बनवण्‍यासही खूप सोपी असेल. 

चला तर मग जाणून घेऊया बेसन बर्फीची सोपी रेसिपी

बेसन स्पेशल बर्फी साठी साहित्य

  • साजूक तूप - कप (150 मिली)
  • बेसन - 1.5 कप (190 ग्रॅम)
  • दूध पावडर - कप (75 ग्रॅम)
  • साखर - 1 कप (200 ग्रॅम)
  • वेलची -4, बारीक चिरून
  • बदाम फ्लेक्स - 1 टेस्पून
  • पिस्ता फ्लेक्स - 1 टेस्पून

बर्फीसाठी पीठ बनवण्याची प्रक्रिया

कढईत 1 वाटी साजूक तूप टाकून गरम करा. आच मध्यम ठेवा. तूप वितळल्यावर त्यात दीड वाटी बेसन घाला आणि सतत ढवळत असताना तळून घ्या. रंग थोडासा बदलून वास येईपर्यंत तळून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर त्यात 1 कप दूध पावडर थोडी थोडी घालावी म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. याची काळजी घ्यावी. नीट ढवळून झाल्यावर थोडा वेळ तसंच ठेवा.

अधिक वाचा-  महाराष्ट्रातील 'हे' धबधबे तुम्हाला देतील फॉरेन लोकेशनचा अनुभव

पाक बनवण्याची प्रक्रिया

पॅनमध्ये 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घाला आणि साखर विरघळेपर्यंत थोडा वेळ ढवळत राहा. साखर विरघळल्यानंतर ते स्ट्रिंग सिरप होईपर्यंत शिजवा. ते पाणी चमच्याने टाका, जेव्हा त्याला तार येईल आणि शेवटचा थेंब पडेल तेव्हा सिरप तयार झालं.

बेसन बर्फी बनवण्याची प्रक्रिया

साखरेचा पाक झाल्यावर त्यात मिल्क पावडर आणि बेसन घालून मिक्स करा. सतत ढवळत असताना त्यात 4 लहान बारीक वेलची घाला आणि चांगले मिसळा. मिक्स करून ठेवल्यानंतर ट्रेला तूप लावून चांगले ग्रीस करा. आता हे मिश्रण एका ट्रेमध्ये ओता आणि चमच्याच्या मदतीने समान बनवा. नंतर बदाम आणि पिस्त्याने सजवा. आता त्यांना चमच्याने थोडे दाबा आणि 2 तास फ्रीजमध्ये ठेवा.

बर्फी थंड झाल्यावर तुकडे करा 

काही वेळ झाल्यावर बर्फी चांगली सेट होईल. त्याचे तुमच्या आवडीनुसार तुकडे करा. नंतर 10 सेकंद आचेवर ट्रे हलका फिरवा आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुकडे काढून सर्व्ह करा. अशा प्रकारे खास बेसन बर्फी तयार होईल, त्याचा आस्वाद घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी