Raksha Bandhan Sweet Recipes: रक्षाबंधनाला 15 मिनिटांत बनवा पारंपारिक पदार्थ, 'ही' आहे सोपी रेसिपी

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 08, 2022 | 11:32 IST

Raksha Bandhan Sweet Dish: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांना मिठाई खाऊ घालतात. यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतात. रक्षाबंधनाला बहिण आपल्या भावासाठी अनेक पदार्थ बनवते.

Raksha Bandhan Meethi Seviyan Recipe
रक्षाबंधनाला 15 मिनिटांत मायक्रोवेव्हमध्ये बनवा गोड शेवया 
थोडं पण कामाचं
  • यंदा गुरूवारी म्हणजेच 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.
  • रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांना मिठाई खाऊ घालतात.
  • यावेळी रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर घरीच गोड शेवया बनवा. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये फक्त 15 मिनिटांत गोड शेवया (Meethi Seviyan) सहज तयार करू शकता.

मुंबई:  Raksha Bandhan Meethi Seviyan Recipe:  यंदा गुरूवारी म्हणजेच 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. प्रत्येक बहिण वर्षभर एका सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात, तो सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). बहीण-भावाच्या पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांना मिठाई खाऊ घालतात. यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतात. रक्षाबंधनाला बहिण आपल्या भावासाठी अनेक पदार्थ बनवते. रक्षाबंधनाच्या निमित्तानं खास थाळी तयार केली जाते. मात्र स्वादिष्ट स्पेशल थाळी गोड पदार्थाशिवाय अपूर्णच असते. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर घरीच गोड शेवया बनवा. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये फक्त 15 मिनिटांत गोड शेवया (Meethi Seviyan)  सहज तयार करू शकता. जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी.

15 मिनिटांत गोड शेवया बनवा

गोड शेवया सर्वांनाच आवडतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ते अगदी आवडीने खातात. दुसरीकडे जेव्हा रक्षाबंधनाचा विशेष प्रसंग येतो, तेव्हा या दिवशी गोड शेवया नक्की बनवा. लोक सण-उत्सवात बिझी असतात आणि त्यांच्याकडे फारसा वेळ नसतो. पण ही डिश बनवायला तुम्हाला फक्त 15 मिनिटे लागतील. होय.. फक्त 15 मिनिटांत, स्वादिष्ट गोड शेवया तयार करू शकता. 

अधिक वाचा-  आता बेस्ट बसचा प्रवास आणखीन सुखकर, प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची

मायक्रोवेव्हमध्ये गोड शेवया बनवा

तुम्ही गोड शेवया खाल्ल्या असतील. पण आत्तापर्यंत तुम्ही ते गॅसवर बनवले असेल किंवा बनवताना पाहिले असेल. मात्र मायक्रोवेव्हमध्येही गोड शेवया सहजपणे तयार केल्या जातात आणि विशेष म्हणजे त्याची चव अजिबात बदलत नाही. जाणून घ्या मायक्रोवेव्हमध्ये गोड शेवया बनवण्याची पद्धत.

गोड शेवया बनवण्यासाठी लागणारे साहित्य

100 ग्रॅम शेवया, अर्धा लिटर दूध, 1 छोटी वाटी साखर, 1 चमचा चारोळी, 1 चमचा वेलची पावडर, दुधात भिजवलेले चिमूटभर केशर, एक वाटी चिरलेले काजू, पिस्ता, बदाम आणि आवश्यकतेनुसार पाणी.

मायक्रोवेव्हमध्ये कशा बनवायच्या शेवया

सर्व प्रथम मायक्रोवेव्ह सुरक्षित भांड्यात शेवया आणि पाणी घालून शिजवा. शिजल्यावर शेवयातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. यानंतर त्यात साखर, दूध, चारोळी आणि वेलची पूड घालून मिक्स करा. नंतर मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा 8-10 मिनिटे शिजवा. वेळोवेळी मायक्रोवेव्ह उघडून तपासत राहा कारण शेवया तळाशी चिकटत नाही. नंतर शेवईमध्ये केशर मिश्रित दूध टाका. मायक्रोवेव्हमध्ये काही सेकंद शिजवा आणि ड्रायफ्रूट्सनी गार्निश करून सर्व्ह करा.

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी