Raksha Bandhan Recipe: रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर बनवा स्पेशल चॉकलेट बर्फी, जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी

Raksha Bandhan Chocolate Sweets: येत्या 11 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. मिठाईशिवाय रक्षाबंधनाचा सण अपूर्ण आहे. यावेळी बाजारातील मिठाईनं नाही तर स्वतःच्या हातानं आपल्या लाडक्या भावासाठी चॉकलेट बर्फी बनवा आणि भावाला खाऊ घाला. यामुळे एकमेकांमधील प्रेम वाढेल आणि भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा येईल.

Raksha Bandhan Chocolate Burfi Recipe
स्पेशल चॉकलेट बर्फी 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक बहिण वर्षभर एका सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात, तो सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan).
  • या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याला मिठाई खाऊ घालतात. त्या बदल्यात भाऊ आपल्या लाडक्या बहिणीली भेटवस्तू देतात.
  • यंदा 11 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. मात्र मिठाईशिवाय या सणाचा गोडवाच निघून जातो.

मुंबई: Raksha Bandhan Chocolate Burfi Recipe: प्रत्येक बहिण वर्षभर एका सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात, तो सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). बहीण-भावाच्या पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच श्रावण (Shravan) महिन्याला साजरा करण्यात येतो. यंदा 11 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. मात्र मिठाईशिवाय या सणाचा गोडवाच निघून जातो. रक्षाबंधनाचा विचार केला तर रक्षाबंधनाच्या दिवशी ही गोडाची गरज असते. मिठाईशिवाय रक्षाबंधनाचा सण अपूर्ण मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याला मिठाई खाऊ घालतात. त्या बदल्यात भाऊ आपल्या लाडक्या बहिणीली भेटवस्तू देतात. यावर्षी रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्टला आहे. रक्षाबंधनापूर्वी मिठाईच्या दुकानात लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. पण सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येते.

त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाला तुम्ही स्वतःच्या घरी बनवलेली चॉकलेट बर्फी तुमच्या भावाला खायला द्या. याची टेस्ट प्रत्येकाला खूप आवडते आणि ती घरीही सहज बनवता येते. जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी.

अधिक वाचा-  मुंबईकरांना 'स्वाईन फ्लू'चा धोका, महागड्या लॅब टेस्टमुळे नागरिक त्रस्त

चॉकलेट बर्फीसाठी लागणारे साहित्य

2 कप मॅश केलेला खवा (मावा), 1/3 कप पिठी साखर, 1/4 कप दूध, 2 चमचे कोको पावडर, 1 टीस्पून वेलची पावडर, 2 चमचे बदाम आणि पिस्ता (बारीक चिरून)

चॉकलेट बर्फी बनवण्याची कृती

सर्वप्रथम कढई गरम करून त्यात मावा मंद आचेवर तळून घ्या. आता त्यात पिठीसाखर, वेलची पूड घाला आणि सतत ढवळत राहा. साधारण 5-7 मिनिटे तळून झाल्यावर मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. आता ते एका रुंद प्लेटमध्ये पसरवा आणि थोडे थंड होऊ द्या. लक्षात ठेवा की मिश्रण ताटात टाकण्यापूर्वी त्याला तूप किंवा लोणी लावा. 

माव्याचे अर्धे मिश्रण वेगळे करा आणि अर्ध्यामध्ये कोको पावडर घाला. प्लेटच्या तळाशी पांढरा भाग ठेवा आणि त्यावर कोकोचे मिश्रण पसरवा. काही तास असेच राहू द्या. थंड झाल्यावर तुमच्या बर्फीला शेफ देऊन कापून घ्या. आता बारीक चिरलेले बदाम आणि पिस्त्याने सजवा तुमची बर्फी सजवा. राखीच्या खास सोहळ्यासाठी चॉकलेट बर्फी तयार आहे.

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी